अकोला शहर वाहतूक पोलिसांची सजगता…हरविलेला मोबाईल क्षणात केला परत

0
700
Google search engine
Google search engine

अकोलाः संतोष विणके

प्रामाणीक पोलीसांचा नागरीकांनी केला सत्कार

मोबाईल हरवल्यावर होणारी गैरसोय अनेकांना परिचित आहे कित्येकदा तर हरवलेला मोबाईल मिळणे दुरापास्त होते मात्र अकोला शहर वाहतूक शाखेच्या एका प्रामाणिक पोलिस कर्मचाऱ्याने एका हरवलेल्या नागरिकाचा मोबाईल त्वरित परत मिळवुन दिल्याने पोलिसांच्या प्रामाणीकते सुखद चेहरा लोकांसमोर आला.
जागरूक पोलीस आणि जागरूक नागरिकांनी आपले कर्त्यव्य पार पडल्याची एक अनोखी घटना आजच्या या घटनेने समोर आली,

याबाबत सविस्तर वृत्त असे कि शहर वाहतूक शाखा अकोलाचे कर्मचारी अजहर शेख हे स्थानिक अग्रसेन चौकात आपले कर्त्यव्य पार पाडत असतांना त्यांना एक मोबाईल स्मार्ट फोन खाली पडलेला आढळून आला त्यांनी तो लगेच स्वतः कडे घेऊन मोबाईल मालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली परंतु फोन लॉक असल्याने ते शक्य झाले नाही तेवढ्यात चैतन्य सुळे नावाच्या तरुणाचा त्या मोबाईल वर फोन आला आणि त्याने सदर मोबाईल त्याचा असल्याचे सांगितले पोलीस कर्मचारी अजहर शेख ह्याने त्वरित त्यांना अग्रसेन चौकात बोलावून खात्री करून त्यांचा मोबाइलला त्यांना परत दिला

त्यांनी अजहर शेख ह्यांना त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणा बद्दल त्यांना रोख बक्षीस देण्याची इछा प्रदर्शित केली परंतु अजहर शेख ह्यांनी हे त्यांचे कर्त्याव्यच असल्याचे सांगून विनम्र नकार दिला म्हणून त्यांनी भरचौकात पुष्पगुच्छ आणून त्यांच्या कर्त्यव्याचा सत्कार केला हे एक प्रकारे जागरूक नागरिकाने जागरूक पोलिसांच्या कर्त्याव्य भावनेचा केलेला सलामच आहे सदर कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक पणाचे शहर वाहतुक पोलीस निरीक्षक गजानन शेळके व सहकारी पोलीस कर्मचर्यानी कौतुक केले.