बेंबळी ठाण्याचे पोलीस अधीकारी शेख कर्तव्यदक्ष ; कनगरा पोलीस पाटलाची माघार !

0
988
Google search engine
Google search engine

बेंबळी ठाण्याचे पोलीस अधीकारी शेख कर्तव्यदक्ष ; कनगरा पोलीस पाटलाची माघार !

उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील पोलीस पाटलासोबत बेंबळी पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्यासोबत कोरोना जणजाग्रती बाबत किरकोळ शाब्दिक चर्चेतून एकामेकांचा गैरसमज झाला होता तो गैरसमज दूर झाल्यामुळे दिलेला राजीनामा मागे घेत असल्याची कबूली कनगरा येथील पोलीस पाटिल वाजीद शेख यांनी दिली आहे.
याबबत अधीक माहिती अशी की बेंबळीचे प्रभारी पोलीस अधिकारी मुस्तफा शेख यांनी कनगरा येथील येथील पोलीस पाटिल वाजीद शेख यांना बेंबळी पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन राजीनाम्या बाबत विचारणा करुन संबधीत घडलेल्या प्रकाराबाबत त्या कर्मचार्याना समोर बोलावून दोघांमध्ये किरकोळ झालेले गैरसमज दूर केले व लागलीच उस्मानाबाद येथील उप विभागीय दंडाधीकारी रोडगे साहेबांना मुस्तफा शेख यांनी फोन करुन वाजीद शेख यांनी दिलेला राजीनामा मंजूर न करण्याची दोन वेळा शिफारस पोलीस पाटलाच्या समोरच केली होती त्यामुळे कनगरा येथील पोलीस पाटलाने राजीनामा माघार घेत असल्याचे सांगून बेंबळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधीकारी हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत मी काल रागाच्या भरात त्यांनीही मला त्रास दिला होता अशी प्रतिक्रीया दिली होती. सध्या माझा गैरसमज दूर झाल्याची कबुली कनगरा येथील पोलीस पाटिल वाजीद शेख यांनी आमच्या प्रतिनीधीला दिली.

पोलीस पाटिल वाजीद शेख ,कनगरा