मोर्शी वरुड तालुक्यातील ९१० खचलेल्या विहिरींना मंजुरात देण्याची मागणी – आमदार देवेंद्र भुयार यांची नरेगा आयुक्त यांच्याशी सकारात्मक चर्चा ! 

0
577
Google search engine
Google search engine

लॉकडाऊन काळात ‘मनरेगा’ अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमदारांचा पुढाकार ! 

 

वरुड तालुका प्रतिनिधी /
मोर्शी वरुड तालुक्यामध्ये २०१३ -२०१४ ते २०१९ – २०१९ या काळामध्ये अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील हजारो विहिरी पावसामुळे खचल्या आहेत. विहिरीच्या सभोतालच्या कडा खचल्या असल्याने या विहिरीतून साधे ओलीत करणेही कठीण झाले आहे. मोर्शी वरुड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहीरी मग्रारोहयो अंतर्गत दुरुस्ती करीता मान्यता देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी नरेगा आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे .
मोर्शी वरुड तालुक्यातील  सन २०१३-१४ ते सन २०१८-१९ या कालावधीत वरुड तालुक्यातील एकुण ६०६ विहीरी खचलेल्या आहेत. तसेच मोर्शी तालुक्यातील ३०४ विहीरी खचलेल्या आहेत. मोर्शी वरुड तालुक्यातील  एकून ९१०  विहीरी मग्रारोहयो अंतर्गत दुरुस्ती करीता अनेक वर्षांपासून पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव प्रलंबीत आहेत जिल्हा परिषदेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या  वेळकाढू धोरणामुळे खचलेल्या विहिरींचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून धूळखात पडलेले आहेत या गंभीर प्रकारची दखल घेऊन  मोर्शी वरुड तालुक्यातील खरचलेल्या विहीर दूरुस्तीच्या कामांना मग्रारोहयो अंतर्गत दुरुस्ती करीता मान्यता प्रदान करण्यात यावी, व प्रशासकीय मान्यतेचे आदेश सबंधित यंत्रणेस देण्यात यावेत अशी मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी नरेगा आयुक्त  यांच्याकडे केली आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली . मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या या योजनेमुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटनार असल्यामुळे मजुरांना कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही त्याकरिता नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून मजुरांचा प्रश्न सोडविण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्याचे मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक यांच्याकडे केली.
लॉकडाऊनमुळे उद्योग व व्यापारावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच शेतकरी व शेतमजूर यांच्यासोबत उपजीविकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या घटकांना दिलासा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यास प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून रोजगारनिर्मिती करण्याची, मोर्शी वरुड तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्राची वाहतूक करण्यासाठी व शेतीमध्ये जाण्यासाठी पांदण रस्त्यांची कामे करणे महत्वाचे असल्यामुळे खडीकरण व डांबरीकरनाची कामे करणे, एमआरजीएस अंतर्गत अभिसरणात येणारी २८ कामे शासनाच्या नियमानुसार त्यांचे आमदार निधी अंतर्गत अभिसरण करून ते कामे पूर्ण करण्याची संकल्पीय सकारात्मक चर्चा आमदार देवेंद्र भुयार यांनी नरेगा आयुक्तांशी केली .
मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ देण्याचा संकल्प असल्यामुळे तात्काळ कामे सुरु करण्यात संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. मजुरांची ही संख्या सातत्याने वाढत असून प्रत्येक तालुकास्तरावर मागणी नुसार कामांचे नियोजन करण्यात करण्याच्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केल्या.  मोर्शी वरुड तालुक्यात विविध प्रकारचे कामे सुरू झाली असून कामावर असलेल्या प्रत्येकाला १५ दिवसाच्या आत त्यांची मजुरी थेट बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्याच्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी केल्या.             प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकामाला प्राधान्य देण्यात आले असून राज्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगाअंतर्गत कामांना सुरुवात करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लॉकडाऊनचा पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात केली आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी येवेळी सांगितले यावेळी बैठकीला आमदार देवेंद्र भुयार,  माजी पंचायत समिती सभापती निलेश मगर्दे , राष्ट्रवादी काँगेस तालुका अध्यक्ष बाळू पाटील कोहळे यांच्यासह रोजगार हमी योजनेचे अधिकारी उपस्थित होते .