७० विज्ञान पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मंजूर !

0
1128
Google search engine
Google search engine

७० विज्ञान पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मंजूर*

विकास उबाळे / उस्मानाबाद
उस्मानाबाद प्रतिनिधी उस्मानाबाद जि प अंतर्गत कार्यरत असलेल्या ७० विज्ञान विषयाच्या पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी आज दि १४ ऑगस्ट 2020 रोजी जि प ने मंजूर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष संतोष देशपांडे यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की
उस्मानाबाद जि प अंतर्गत जवळपास 410 शिक्षकांना विज्ञान पदवीधर शिक्षक या पदावर दर्जावाढ देण्यात आली होती. त्यापैकी 70 शिक्षकांनी बी एस सी पदवी पूर्ण केल्याने त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. ते प्रस्ताव आज मा मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी मंजूर केले.
या प्रश्नाबाबत शिक्षक संघाने प्रदेशाध्यक्ष श्बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली मा मुख्य कार्यकारी अधिकारी कोलते , उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुबाकले , तत्कालीन शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार मॅडम यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
व या Bsc पूर्ण केलेल्या ७० विज्ञान पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्याबाबत मागणी केली होती.
या निर्णयाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते , उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुबाकले , तत्कालीन शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, विद्यमान शिक्षणाधिकारी रामलिंग काळे , विस्तार अधिकारी सुरेश वाघमारे, कक्ष अधिकारी श्री लांडगे, श्री जेवळीकर, लिपिक श्रीम कानमुशे यांचे शिक्षक संघाच्या वतीने बाळकृष्ण तांबारे,एल बी पडवळ, सोमनाथ टकले, अशोक जाधव, भक्तराज दिवाने, बाबा मते, संतोष देशपांडे,अर्जुन गुंजाळ, विठ्ठल माने, श्रीनिवास गलांडे, व्यंकट पोतदार, सुधीर वाघमारे, प्रदीप म्हेत्रे, बालाजी माळी, धनाजी मुळे, रणजित पाटील, अनिल बारकुल, रवि कापसे,राजेंद्र गव्हाणे यांनी आभार व्यक्त केले आहेत