कोरोनाचे संकट तर चोरांची दिवाळी : २ लाख १२ हजाराची जबरी चोरी : महिलेवर चाकुचा वार

0
1009
Google search engine
Google search engine

परळी वैजनाथ: नितीन ढाकणे, दिपक गित्ते 

घरात आपल्या पती व मुलांसह झोपलेल्या महिलेचा गळा दाबून हातावर चाकुचा वार करत कपाटातील नगदी ८० हजार व तीन तोळे तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.शहरातील मध्यवर्ती असलेल्या पंचवटी नगर भागात घडल्याने नागरीकांमध्ये दहशत पसरली आहे.

बालाजी फड हे आपली पत्नी व दोन मुलांसह शहरातील पंचवटी नगर भागात राहतात बुधवार दि.१२ रोजी रात्री १२.३० च्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटाचे कुलुप तोडले या आवाजाने अश्विनी फड यांना जाग आली असता एका चोरट्याने त्यांचा गळा दाबुन हातावर चाकुने वार केला व अंधाराचा फायदा घेवुन चोरटे पसार झाले.या प्रकाराने सर्व कुटुंब जागे झाल्यानंतर कपाटातील सामान बाहेर अस्ताव्यस्त पडलेले दिसले झालेला प्रकार परळी शहर पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले याबाबत अश्विनी फड यांच्या फिर्यादीवरुन कपाटातील नगदी ८० हजार तीन तोळ्याचे गंठण व तीन ग्रॅमची अंगठी असा एकुण २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.