धनगर ऐक्य अभियानचे रक्त लिखीत निवेदन

0
614

आकोटःसंतोष विणके

धनगर आरक्षण अंमलबजावणी त्वरीत करा

धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तसेच समाजाच्या इतर मागण्यांबाबत धनगर एेक्य अभियानच्या वतीने रक्ताने लिहीलेले निवेदन 13 ऑगस्ट रोजी अकोट तहसीलदारांना देण्यात आले. यामध्ये
धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा, धनगर समाजाच्या विकासासाठी घोषीत केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी सह हजार कोटींची तरतूद ताबडतोब करा तसेच मेंढपाळांना आरक्षण देऊन त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवा आदी मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यात आले

. आरक्षण अंमलबजावणी न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर ऐक्य अभियान चे समन्वयक सतीश हांडे यांच्या नेतृत्वात योगेश मोटे, पवन हंडाळ शिवा पाचपोहे, संदीप पाचपोहे, गणेश होळकर क्रांती वाघ सुनील सुलताने यांनी निवेदनातुन दिला आहे.