*बाधित गरोदर महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी कोविड रूग्णालयात स्वतंत्र वॉर्ड* – *जिल्हाधिकारी शैलेश नवाल*

0
574
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 13 : कोरोनाची साथ लक्षात घेता शासनाकडून विविध उपायांची अंमलबजावणी होत आहे. साथीच्या काळात पॉझिटिव्ह आढळलेल्या गरोदर मातांची व बाळाची सुरक्षितता, सुरक्षित प्रसुती आदींसाठी येथील जिल्हा कोविड रूग्णालयात 70 खाटांचा स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

श्री. नवाल म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. गरोदर महिलाही कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे यापूर्वी आढळले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी सुपर स्पेशालिटी रूग्णालयात स्थापित जिल्हा कोविड रूग्णालयात तिस-या मजल्यावर 70 खाटांचे प्रसुतीगृह सुरू करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 19 महिलांची सुरक्षित प्रसुती तेथे झाली आहे.

स्त्री रूग्णालयात दाखल महिलांची चाचणी करण्यात येते. तिथे लक्षणे आढळलेल्या किंवा कंटेनमेंट झोनमधील गरोदर महिलांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, सुरक्षित प्रसुतीसाठी सुपर स्पेशालिटी रूग्णालयात ऑपरेशन थिएटर, लेबर रूम आदींसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाबाधितांवरील उपचारात प्लाझ्माची उपयुक्तता लक्षात घेऊन प्लाझ्मादानासाठी वेळोवेळी आवाहन केले जात आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून व त्यापुढेही प्लाझ्मादात्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल., असेही ते म्हणाले.