७३ व्या स्वातंत्र्यदिनी कोविड योद्धय़ांचा सन्मान केला: अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रेरणादायक कार्य

0
667
Google search engine
Google search engine

 

प्रतिनिधी :

सध्या संपूर्ण जगा सोबतच भारतामध्येही करोना या महामारी संकटाचा सामना करावा लागत आहे ,कोरोना रोखण्याच्या लढय़ात आपले योगदान देणारे सफाई कामगार, डॉक्टर, आरोग्यसेवक तसेच करोनावर मात केलेले नागरिक अशा करोना योद्धय़ांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला.

याच लढ्यामध्ये मोठ्या धेर्याने सामना करत आपली स्वतःची पर्वा न करता सामासाठी आणि समाजाच्या हितासाठी राबणाऱ्या योध्याचा सन्मान करन हेच आपल कार्य आहे असे मोहिनीताई राक्षे व श्री. किरण देवरे म्हणाले, आपले कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल अशे कार्य आपल्या हातून घडावे यासाठी कार्य करणार आहोत, असेही  अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे सर्व पदाधिकारी म्हणाले.

सध्या संपूर्ण जगा सोबतच भारतामध्येही करोना या महामारी संकटाचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये कोरणा-या महामारीच्या सोबतच आपलं कार्य अतिशय चोख बजावणाऱ्या समाजातील विविध घटकातील व्यक्तींना त्यांचा सन्मान व्हावा त्यांना आपल्या कामातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे संस्थापक मा. मोहमदरफी सौदागर यांच्या मार्गदर्शना खाली पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी सौ. मोहिनी ताई राक्षे जिल्हाध्यक्षा ,श्री. किरण देवरे जिल्हाध्यक्ष, व भ्रष्टाचार अपराध मुक्त न्याय दल प्रदेश अध्यक्ष नितीन सैद, तालुका अध्यक्ष  ,सौ. मनिषाताई परदेशी तालुका अध्यक्षा, शैलेश साळुंके तालुका उपाध्यक्ष, सौ.सुषमाताई पोखरकर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अशाच व्यक्तिमत्वास न्याय मिळावा त्यांना कार्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोरणा योद्धा हे सन्मानपत्र देऊन या परिस्थितीत काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून अशाच प्रकारचे कार्य व्हावे याच उद्देशाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यात आला

समाजातील घटक आपल्या स्वतःबरोबरच इतरांचेही भले करण्यासाठी कार्य करतो त्याच  व्यक्तिमत्वास न्याय मिळावा त्याचाच एक भाग अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती यांचे कार्य त्यांची समाजाबद्दल असणारी तळमळ कार्यातून दिसून येते.