आता परळीत ही अँटीजेन तपासणी: १८ ते २० ऑगस्ट होणार तपासणी

0
1037
Google search engine
Google search engine

बीड : नितीन ढाकणे,दिपक गित्ते

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाने सुरवातीला गेवराईत हि मोहीम राबली होती त्यानंतर सलग तीन दिवस बीड शहरात अँटीजेन टेस्ट मोहीम राबली आता त्यानंतर परळी आणि केज शहरातील व्यापार्‍यांचीअँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. या दोन्ही शहरातील व्यापार्‍यांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
परळी शहरात अँटीजेन तपासणीसाठी चार तपासणी केेंद्र निर्माण करण्यात आले आहेत. नटराज रंगमंदिर, बसस्थानक, श्री सरस्वती विद्यालय या केेंद्रात १९ ते २० ऑगस्टपर्यंत सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत तपासणी करण्यात येणार आहे तर चौथे केंद्र १८ ऑगस्ट रोजी सावतामाळी मंदिर जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर १९ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालय व २० रोजी शारदा नगर येथील विद्यार्धिनी विद्यालयात सकाळी ८ ते सायं. ५ या दरम्यान अँटीजेन तपासणी केन्द्र उपलब्ध आहे.