खाजगी आरोग्य कर्मचारी यांना विमा संरक्षण द्या- जय भगवान महासंघ

172

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

दि-१७- ‘ जय भगवान महासंघ परळी वै ‘ आणि जय भगवान महासंघ खाजगी आरोग्य कर्मचारी संघ परळी वै जिल्हा बीड यांच्या वतीने सोशल डिस्टन्स चे पालन करत मा. तहसीलदार साहेबांना ‘ खाजगी आरोग्य कर्मचारी यांना संरक्षण देणे बाबत ‘ निवेदन देण्यात आले.
जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. बाळासाहेब जी सानप आणि जय भगवान महासंघाचे तालुकाध्यक्ष मा. बाळासाहेब फड यांच्या सूचनेवरून हे निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हणले आहे की महाराष्ट्रातील सर्व खाजगी आरोग्य कर्मचारी (महिला /पुरुष ) २४ तास सेवा देत आहोत. त्यांना कुठलेही वेळेचे बंधन नसते तरी आपण मा. पोलीस निरीक्षक साहेब यांना सर्व खाजगी आरोग्य कर्मचारी यांना संरक्षण देण्यात यावे असे आदेश द्यावेत महाराष्ट्रातील सर्व खाजगी आरोग्य कर्मचारी यांची शासकीय नोंद करावी तसेच त्यांना ( शासनाच्या जी.आर नुसार ) संरक्षण विमा देण्यात यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील खाजगी आरोग्य कर्मचारी हे काम बंद आंदोलन करतील असा इशारा यावेळी जय भगवान महासंघ यांच्यातर्फे देण्यात आला. यावेळी जय भगवान महासंघाचे परळी शहराध्यक्ष राज फड, खाजगी आरोग्य कर्मचारी शहराध्यक्ष प्रदीप बोबडे,रमेश ताल्डे, गौतम साळवे, कल्पना सोनकांबळे, अर्चना डौंड, महेश मस्के, प्रशांत कांबळे , संघपाल, दबडे मिलिंद, जाधव, समाधान गवळी , दिल्ली प्राचार्य, अशोक डोने उपस्थित होते.

जाहिरात