पाळा येथे आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन  संपन्न – १३ लक्ष रुपयांची विकासकामे

0
1181
Google search engine
Google search engine

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यातील पाळा येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, पाळा येथील अ.जाती व नवबौद्ध घटकांचा विकास कार्यक्रम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे, सातपुडा वस्ती येथे अंदाजे 5 लक्ष रुपये निधी, नाईक वस्ती येथे अंदाजे 5 लक्ष रुपये निधी, तसेच राजीव गांधी वस्ती येथे 3 लक्ष रुपये निधी मंजूर करून विकासकामे करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला यावेळी पाळा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाले . ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज पाळा येथे केले.
भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार,  राष्ट्रवादी मोर्शीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, जी. प. सदस्य अनिल डबरासे, जी प सदस्य संजय घुलक्षे, सभापती यादवराव चोपडे, मोरेश्वर गुडधे, प्रशासक पी. आर. वानखडे, माजी सरपंचा मीना गायकी सचिव वी.रा. वडस्कर , प्रशांत राऊत, विलास राऊत, गणेश ठवली,  प्रशांत राणे, महादेव उईके, मोहन राऊत, शादत पठाण, सुधाकर नागले, शामराव निस्वादे, सागर साठे, इम्रान खान, राजेश सिंग टाक, निलेश निस्वादे, दादाराव ठवळी,श्रणीत राऊत, रुपेश वाळके, श्रीधर भुयार, राजेंद्र उमाळे, साहेबराव गायकी, प्रकाश गीद, आनंदराव पल्लेवार, नामदेव इंगळे यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती .