*अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

0
538
Google search engine
Google search engine

 

*अमरावती प्रतिनिधी* : अहिल्याबाई होळकर सार्वजनिक संस्था द्वारा संचालित अहिल्यादेवी होळकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम प्राचार्य माहुरे मॅडम यांनी ध्वज पूजन केले. याप्रसंगी ध्वजपूजन व ध्वजारोहण करून संस्थेचे अध्यक्ष डॉ. मेघशाम करडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या ध्वजारोहण कार्यक्रमा प्रसंगी बोलताना डॉ. मेघशाम करडे म्हणाले की ,भारत आज 74 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. पण दुसरीकडे कोरोनाच्या महामारी मुळे जगातील नव्हे तर भारतातील सुद्धा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. या व्यवस्थेतून उभारी घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. लवकरच या संकटातून भारत बाहेर पडेल अशी अपेक्षा प्रसंगी व्यक्त केली. याप्रसंगी प्रा. अजय गाडबैल यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीर हुतात्मा बद्दल विचार व्यक्त करून, त्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी प्राचार्य माहुरे मॅडम म्हणाल्या की, आपल्या संस्थेने छोट्या रोपट्याचे वटवृक्ष मध्ये रूपांतर केलेला आहे , याचे श्रेय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अमृत करडे यांना जाते , या संस्थेला उभारी देण्यासाठी आपण सर्व शिक्षकांनी नावलौकिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.चकोर,आभार कु.धवणे
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी कोरोना च्या काळात नियमाचे (Social & Physically Distance ) पालन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला