आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी व खासगी सहाय्यकाला रंगेहात पकडले !

0
813
Google search engine
Google search engine

आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी व खासगी सहाय्यकाला रंगेहात पकडले !

उस्मानाबाद / प्रतिनीधी

तक्रारदार पुरुष व त्यांचा भाऊ यांनी मौजे जवळगा मेसाई, ता. तुळजापूर
येथे त्यांचे आईचे नावावर असलेल्या शेत गट नंबर 329 मधील क्षेत्र 4 हे.6 आर व तक्रारदार यांचा भाऊ यांचे नावावर असलेल्या शेत गट नंबर 244 मधील 26 आर व शेत गट नंबर 246 मधील 17 आर या शेत जमीनीचे वाटणी पत्र 100 रू चे स्टँप पेपरवर नोटरी करुन घेतले होते. सदर वाटणीपत्राआधारे फेर मंजूर करून 7/12 नोंद घेण्यासाठी कागदपत्रे वडगाव लाख सज्जाच्या महिला तलाठी संजीवनी शिवानंद स्वामी यांच्याकडे दिले होते.या कामासाठी तलाठी संजीवनी स्वामी व त्यांचे खाजगी लेखनीक सुभाष नागनाथ मोठे यांनी तक्रारदार यांचेकडे 8,000/- रू. लाचेची मागणी केली.तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क साधून तक्रार दिली असता आज दि.२४/८/२०२०
रोजी तुळजापूर येथील तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी तलाठी संजीवनी स्वामी यांना खासगी मदतनीस सुभाष मोटे यांचे हस्ते ८०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले.
याबाबत तुळजापूर पो स्टे येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री.अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पो.ह. रवींद्र कठारे,दिनकर उगलमुगले,पो. ना. मधुकर जाधव पो. शि. विष्णू बेळे, समाधान पवार,तावस्कर व चालक करडे यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००)यांनी केले आहे.