17 आरोपीसह 9 लाखाच्या वर मुद्देमाल  आरोपी कडून जप्त ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक आणि शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही

0
750
Google search engine
Google search engine

17 आरोपीसह 9 लाखाच्या वर मुद्देमाल  आरोपी कडून जप्त
ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक आणि शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही
6 आरोपी मध्यप्रदेश चे.

चांदुर बाजार:-बादल डकरे

                    अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांचे विशेष पथक याना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे त्यांनी शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत जुगार आणि वरली मटका वर रेड केली असता या यशस्वी कार्यवाही त्यांनी 17 आरोपी सह 10 लाखाच्या जवळपास मुद्देमाल जप्त केला आहे.ही कार्यवाही दिनांक 23 ऑगस्ट ला दुपारच्या सुमारास करण्यात आली.

                 पोलिसांनी केलेल्या कार्यवाही मध्ये आरोपी 1)प्रफुल्ल साहेबराव आकरे वय 30 रा कुऱ्हा देशमुख,2)अमित रुपरावजी डवरे वय 21 रा.कुऱ्हा देशमुख,3)शंकर गोपाल सिह सूर्यवंशी वय 22 वर्ष रा.कुऱ्हा देशमुख,4)राजा रतन खाडे वय 30 वर्ष रा.खोमाई,मध्यप्रदेश 5)शेख रशीद शेख अमीर वय 50 वर्ष रा.खोमाई मध्यप्रदेश 6)राकेश मगनलाल अग्रवाल वय 35 रा.खोमाई मध्यप्रदेश,7)सबलू मरवक पंधरम वय 19 वर्ष रा.दाबा मध्यप्रदेश,8)शेखर समलू पंधराम वय 19 ढाबा मध्यप्रदेश,9)मुन्ना भोजेलाल मावस्कर वय 42 रा.पळसखेडी मध्यप्रदेश,10)राहुल श्यामराव गजबिये वय 39 रा.शिरजगाव कसबा,11)अब्दुल फारूक अब्दुल करीम वय 42 रा.फरमानपुरा अचलपूर, 12)मो. टाकीब मो.गुल हसन वय 30 बागवान पुरा रा.अचलपूर,13)सैयद मोसीन सैयद महमूद रा.27 वर्ष  रा.किल्लाजवळ अचलपूर,14) नमिर बेग वल्ड जाहिर बेग वय 44 सराफा लाइन देवळी रा.अचलपूर,15)शैलेंद्र वसंत चौरशिया वय 41 वर्ष छोटा बाजार रा.परतवाडा,16)चंद्रशेखर विश्वसराव गणोरकर वय 35 रा.कांडली परतवाडा,17)गजानन गोविंदराव डोगरे  वय 60 रा.मो.चौक परतवाडा यांना ताब्यात घेतले.

यांच्या ताब्यातून 17 मोबाईल किंमत 1लाख 26 हजार,1 लाख 79 हजार 530 रुपये नगदी,वाहनांची किंमत 630000 मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांचे विशेष पथक प्रमुख अजय आकरे,शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल उपाध्यय,विशेष पथक मधील नाईक पोलीस कॉस्टबल स्वप्नील तनवर, अजमद सैयद ,रवींद्र बावणे,पोलीस कॉस्टबल पंकज फाटे,वाहन चालक वाशीम शहा,शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे खुफिया अंकुश अरबत,प्रवीण ठाकरे यांनी केली.