उपोषण कर्त्यांंच्या मागण्या मान्य! आंदोलनास यश

0
416

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने नगर परिषद माजलगाव समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

दि:-२४- माजलगाव शहरातील प्रभाग क्र.१मध्ये अर्धवट पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन तात्काळ सूरू करण्यात यावी या मागणी साठी नगर परिषद समोर बेमूदत धरणे अंदोलन करण्यात आले होते. या अंदोलणास राॅ.का. यूवा नेते आरेफ खैरूल्ला खान, प्रहार संघटनेचे नितिन कांबळे, गोपाळ पैजणे, मानवी हक्क अभियान चे राम वाघमारे, अशोक ढगे, रंगणाथ निकम, नगरसेवक इद्रिश पाशा आदी संघटनेने जाहीर पाठींबा दिला. या वेळी अंदोलन कर्ते, तालुकाध्यक्ष मुस्ताक कुरैशी, अखील कुरैशी, संदिप घेणे, मोसीन बागवान, गंगाधर घेणे, अंकूश घेणे, बेबी नंदा भूजंगे, आदी लोकांनी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली अंदोलन करण्यात आले व उपोषणकर्त्यांना नगर परिषदेच्या वतीने लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. पाणी पाईपलाईन चार ते पाच दिवसात पूर्ण करून सर्वाना मूबलक पाणी मिळेल अशा आशयाचे लेखी निवेदन घेवून बेमूदत धरणे अंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.