सम्राट अशोक नगरच्या नशिबी असुविधांचाच बोलबाला

0
438
Google search engine
Google search engine

सम्राट अशोक नगरच्या नशिबी असुविधांचा बोलबाला

वर्षानुवर्षे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

दि-२६-परळी शहरातील गजबजलेल्या या सम्राट अशोक नगर या भागातील नागरिक सतत नगरपरिषदेला निवेदन करत आलेले आहेत , तरीदेखील नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांनी झोपेचं घेतलेलं सोंग सुटता सुटत नाही. सम्राट अशोक नगर हा भाग मागासवर्गीय असल्यामुळे मुद्दाम दुर्लक्षित केला जात आहे की काय असा सवाल अशोक नगरच्या जनतेच्या मनात घर करून बसलेला दिसतोय.
गेली कित्येक वर्षापासून या भागामध्ये नाली, पाणी,रस्ता, आणि सर्वात महत्वाचं आजवर या अशोक नगरच्या जनतेला स्वछता काय असते हे पाहायला मिळालेलं नाही अस दिसत. सर्वत्र पाण्याचे ढव, चिखल, सर्वत्र घाण कचरा असून, असे चित्र पाहता अशोक नगर हे सध्या ‘अ’स्वच्छतेचे माहेर घर बनले आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही. अशोक नगर या भागातील नगरसेवकांकडून या सर्व प्रकाराकडे मुद्दाम दुर्लक्ष तर होत नाही ना? असा प्रश्न हे सर्व चित्र पाहता प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही. अशोक नगर या भागात घाणीच्या साम्राज्याने नागरिक त्रस्त झाले असून नगरपरिषदेचे या अशोकनगर भागाकडे कधी लक्ष केंद्रित होणार आणि या मागासवर्गीय भागला “न्याय” कधी मिळणार असा प्रश्न या भागातील तमाम जनतेला पडला आहे. परळी नगरपरिषदेचा नुसता देखावा गेली कित्येक वर्षापासून अशोक नगर या भागात पाहायला मिळालेला आहे. निवडणुका आल्या की मत मागायला नेतेमंडळी जीवच रान करतात सर्व फिरत असतात. मग ज्या जनतेच्या मतांवर आपण ही पद भूषवत आहोत त्या जनतेला आपण सर्व सोई- सुविधा पण द्यायला पाहिजेत ज्या आपण निवडणूक पूर्वी मतदान मागताना या जनतेला आश्वासनरुपी दिल्या होत्या, आणि त्या आश्वासनरुपी सुविधा आजही कित्येक वर्षे झालं “अश्वासनरुपीच” आहेत अस हे सर्व चित्र पाहता वाटत आहे.
परळी नगर परिषदे कडून फक्त या भागात स्वच्छ सर्वेक्षण फलक लावून ठेवले आहे पण खरंच या भागात स्वच्छता आहे का? नगरपालिका व संबंधित अधिकारी हे या भागाकडे का लक्ष देत नसतील बरे?
मागावर्गीय वस्ती मधेच अशी घाण का बरं? असे अनेक प्रश्न येथील जनतेच्या मनात घर करून बसलेले आहेत आधीच कोरोनाच्या या संकटामुळे जगणं आणि वावरणं कठीण झालेलं आहे , कोरोनाचे नवीनच संकट उभे असल्यामुळे अस्वचतेमुळे या जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि अश्या परिस्थितीत नगरपालिका प्रशासनाने या सर्व बाबींकडे लक्ष केंद्रित करून या जनतेला आता तरी सर्व सोई-सुविधा देऊन या सर्व परिस्थितीतून लवकरात लवकर मुक्तता करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.