स्व.मेजर ध्यानचंद जन्मदिनी फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ

0
1350
Google search engine
Google search engine

अकोटःता.प्रतिनिधी

स्व.मेजर ध्यानचंद जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ अंतर्गत धावण्याचे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. “धावणे” हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे.शरीर नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी(फिटनेस) नियमित व्यायामाची आवश्यकता असते . नियमित व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वाना लठ्ठपणा , आळस,तणाव,चिंता , आजार इ. पासून मुक्त होण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन हि चळवळ दि २९ ऑगष्ट रोजी व हॉकी खेळाचे महान खेळाडू स्व.मेजर ध्यानचंद यांचे जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिनापासून दि २ ऑक्टों. पर्यंत राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत खेळाडू / पुरुष / महिला / नागरिक / सर्व शैक्षणिक संस्था / विविध एकविध क्रीडा संघटना / विविध क्लब इत्यादी सहभागी होऊ शकतात . प्रत्येक जण धावण्यासाठी / चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग , व्यक्तीशः अनुकूल वेळ निवडू शकता . आश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे / चालणे करु शकनार आहेत

. प्रत्येकास स्वतःच्या वेगाने धावणे / चालण्याची मुभा असणार आहे . स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकींग अॅप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करुन धावलेल्या चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे. प्रत्येक स्पर्धक आपल्या स्पर्धेतील आपल्या धावण्याचे सहभागी असल्याचे फोटो वेबसाईट वर अपलोड करून ईमेल तथा पीडीएफ स्वरूपात प्रमाणपत्र मिळवु शकणार आहे.अधिक माहिती साठि जिल्हा क्रीडा कार्यालय येथे सम्पर्क साधुन -www.fitinidia.gov.in.येथे नोंदणी करु शकतात.