युवासेनेचा माणुसकीचा पाझर… ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना फळ,बिस्कीट वाटप…

218

अकोटः संतोष विणके

कोरोना सारख्या चिनी महामारीने दवाखाना व रूग्ण म्हटले की कुणीही चार हात लांब पळतांना दिसतोय…त्यातही सरकारी रुग्णालय म्हणताच कुणी फिरकुन पाहत नसतांना सामान्य रुग्ण हे असहाय आहेत.या रुग्णांबद्दल आपुलकी व माणुसकीचा आधार म्हणुन युवासेना धाऊन आली आहे.

रुग्णालयात असलेल्या रुग्णांची परिस्थिति पाहता अकोट ग्रामीण रूग्णालयात युवासेनेच्या वतीने फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.तसेच रुग्णांच्या समस्या ऐकुन घेण्यात आल्या रुग्णांबद्दल युवासेनेचा माणुसकीचा पाझर हा दिलासादायक व कौस्तुकास्पद ठरला एवढं मात्र नक्की.

हा उपक्रम युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक राहुल कराळे,यांच्या मार्गदर्शनात युवासेना शहर उपाध्यक्ष गोविंदा चावरे, निलेश मोगरे,शेखर बोंडवाल,यश मोगरे, अवि पाटिल, जय मर्दाने,कार्तिक चावरे,राहुल छापरवाल,विजय चावरे,कार्तिक चंडालिया,योगेश चावरे,गोलु बोबडे.आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात