आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते चांदस वाठोडा, दाभी लघू सिंचन प्रकल्पाचे जलपूजन – १६२३ हेक्टर सिंचनक्षेत्रा करीत बंदिस्त पाईप लाईन द्वारे पाणी !

0
772
Google search engine
Google search engine
३५ कोटी निधिकरीता आमदार देवेंद्र भुयार यांचा पाठपुरावा !
वरुड तालुका प्रतिनिधी /
     वरुड मोर्शी तालुका ड्राय झोन मध्ये असून तेथे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प असून मागील १० वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यामुळे सिंचन प्रकल्पांचे काम रखडलेले असून ते सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन, १६२६ हेक्टर  क्षेत्राकरीता बंदिस्त पाईप लाईन द्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याकरिता येणाऱ्या अधिवेशनामध्ये ३५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.   मोर्शी वरुड तालुका ड्राय झोन मुक्त करण्यासाठी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी कंबर कसली आहे .
  वरुड तालुक्यातील शेतकरी आणि जनसामांन्यांचे जीवन समृद्ध व्हावे आणि वरुड तालुक्याला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला. मोर्शी वरुड तालुका समृद्ध करण्यासाठी माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, यांनी दूरदृष्टी ठेऊन मोर्शी वरुड तालुक्यात विविध सिंचन प्रकल्प तयार करून पाण्याची पातळी वाढल्यामुळे संत्रा बागांचे प्रणाम वाढल्यामुळे विक्रमी संत्रा उत्पादनामुळे मोर्शी वरुड तालुक्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख निर्माण झाली माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचा हा दृष्टिकोन लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील अपूर्ण असेलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन मोर्शी वरुड तालुका दुष्काळमुक्त करून सुजलाम सुफलाम करणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी चांदस वाठोडा, दाभी लघू सिंचन प्रकल्पाचे जलपूजन करतांना दिली .
     चांदस वाठोडा, दाभी लघु जलसिंचन प्रकल्पांमुळे चांदस वाठोडा, मुसळखेडा, दाभी, सुरळी, कुरळी, मोरचुंड, फत्तेपुर, चिंचरगव्हान, उदापुर परिसरातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.
    यावेळी जलपूजन कार्यक्रमाला मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, जी प सदस्य राजेंद्र बहुरूपी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळू कोहळे पाटील,माजी सभापती राजाभाऊ कुकडे, माजी सभापती निलेश मगर्दे, सरपंच मनोज गाडे, ऋषिकेश राऊत, विष्णुपंत निकम, सुभासराव बारस्कर, सुभाषराव शेळके, गंगाधर शेळके, निलेश कोहळे,रामकृष्ण राऊत,मनीष कडू, नवाब कुरेशी, निलेश सालोडे, नितीन पानसे, संजय चोबीतकर, गजानन चोबीतकर, रामभाऊ गावंडे, रमेशराव उघडे, अरविंद भुसारी, प्रभाकर गाडबैल, आकाश बेलसरे,  शिवाजीराव देशमुख, प्रदीपकुमार देशमुख, देविदास बारस्कर, मोहन झोड, ज्ञानेश्वर यावले,तुषार गुडधे, कुमार पडोळे, किशोर चंबोळे, सागर सालोडे, प्रवीण महल्ले, किशोर हेलोडे, उमेश राऊत, सागर राऊत, जगदीश राऊत, कैलास निकम, प्रफुल निकम, अरविंद डंबाळे, नितीन नथीले, वैभव फुके, सूरज धर्मे, दीपक काळे, ताहीर शेख, प्रणव कडू, गोपाल भाकरे यांच्यासह  आदी प्रामुख्याने उपस्थित होते.