विर शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या ५१ कार्यकर्त्यांची रक्तदानातुन गणेशवंदना…

0
1153
Google search engine
Google search engine

रक्तदान करुन दिला गणरायाला निरोप…

आकोटः संतोष विणके

स्थानिक वीर शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या 51 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या गणेशोत्सवातून सामाजिक परंपरा कायम ठेवत साधेपणाने व उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा रक्तदान शिबिराचे आयोजन विर शिवाजी गणेशोत्सव मंडळ छत्रपती संभाजी महाराज चौक,हीवरखेड रोड अकोट यांच्या वतीने करण्यात आले होते.सलग 5 वर्ष पासुन गणेशोत्सवात रक्तदान करून अभिनव गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते साजरा करतात यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव पाहता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात रक्तदान शिबिर पार पाडले.

शिबिरात 51 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले शिबिर यशस्वी करन्या करीत धनराज गावंडे,शशांक कासवे.अक्षय घायल.अक्षय गावंडे.प्रतीक भगत.विशाल भगत.शुभम देशपांडे.अमीत दुबे.दत्ता डिक्कर.किरण इंगळे.सौरभ बरे.नरेश सभागचंदानी.सुमीत भगत.हर्षल शर्मा.पीयुष कासवे.सुचक भाबुंरकर.निखील डहेनकार.आशिष गवई.तेजस लेंघे व असंख्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले