महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिलांसाठी सामाजिक आशयाच्या उखाण्यांची स्पर्धा

0
726
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 4 : महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिलांसाठी सामाजिक आशयाच्या उखाण्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा बचत गटांच्या महिला सदस्यांसह इतरही सर्व महिलांसाठी खुली आहे. महिलांनी नाविन्यपूर्ण, जनजागृतीपर, सामाजिक आशयाचे दीड ते जास्तीत जास्त तीन मिनीटांचे उखाण्याचा व्हिडीओ तयार करून दि. 10 सप्टेंबरपूर्वी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, श्यामनगर, अमरावती (संपर्क 2566038 ई- मेल : ukhanespardha@gmail.com) या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उखाण्याचा आशय प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तीरेखा, महिला सुधारक यांच्या कार्याचा उल्लेख असावा. स्त्री- पुरूष समानता या मूल्यांचा पुरस्कार करणारा असावा.

जिल्हा स्तरावर ‘माविम’च्या बचत गटांच्या महिला सदस्यांपैकी तीन व इतर महिलांच्या प्रवेशिकांपैकी तीन अशा सहा प्रवेशिका निवडून विभागीय स्तरावर पाठविले जातील. त्यातून विभागीय स्तरावर, तसेच राज्यस्तरावर निवड केली जाणार असून, प्रमाणपत्र, समानचिन्ह दिले जाणार आहे. राज्यस्तरावर सहा विजेत्यांना राज्य साहित्य संमेलनात सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

000