‘ती’ ग्रामपंचायत झाली ग्लोबल !

0
591
Google search engine
Google search engine

बुलढाणा जिल्ह्यातील पहिली डिजीटल ग्रामपंचायत !

बुलढाणा (अजिसपुर):- विकासाच्या दिशेने धावणारी गावे जगाशी जोडली जावी, गावातील व्यवहार सहज व सुलभ व्हावा, तरुण पिढीच्या हाती आलेले अँड्रॉईड मोबाईल आणि गावाचा व्यवहार हा एकमेकांशी जोडला जावा, यादृष्टीने ई-ग्राम व्यवस्था बनविण्यात अजीसपुर ग्रामपंचायतीने आपले पाऊल पुढे टाकले आहे. अजिसपुर डिजीटल ग्रामपंचायतिला मोठा प्रतिसाद आपल्या ग्रामस्थांकडून मिळत आहे. ताज्या घडामोडी, शेती विषयक माहिती, आरोग्य विषयक माहिती, सरपंच, उपसरपंच, सदस्यांची माहिती, गावातील नियमित घडामोडी, विविध कार्यक्रम, गावकऱ्यांशी संवाद आदी गोष्टी एका क्लिकवर शक्य झाल्या आहेत. या प्रवाहात अजिसपुर गाव सहभागी झाले, त्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. दुष्काळाशी दोन हात करीत आता ग्रामविकासाचा ध्यास घेतलेली अजिसपुर ग्रामपंचायत (ता.बुलढाणा ) दिजी ग्राम झाली आहे. अत्याधुनिक प्रणालीशी ती जोडली गेली. ”ऐबॉक्स टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स ग्रामपंचायतीचा करार झाला आहे. त्यामुळे हे गाव आता “एका क्लिक’वर आले. सरपंच श्री बाळाभाऊ जगताप तसेच ग्रामसेवक श्री.व्ही.आर.पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गाव आता विकासाच्या नव्या दिशेने जाणार आहे.

आता एखादी माहिती सांगण्यासाठी गावात दवंडी द्यायचे दिवस मागे पडतील. एका क्लिकवर गावकऱ्यांना निरोप मिळायला लागतील. हवामानविषयक शंका व माहिती सोबतच घर पट्टी कर, पाणी भरणा कर येथे उपलब्ध होई ल असा जवळ जवळ सर्व कारभार ऑनलाईन पद्धतीने चालेल ही वैशीष्टे डिजीटल ग्रामपंचायतीची असणार आहे.