चिंता वाढवणारी बातमी :- जिल्ह्यात गत चोवीस तासात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू

0
3707
Google search engine
Google search engine

*दहा कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. 11 – जिल्ह्यात गत चोवीस तासात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद शल्यचिकित्सक कार्यालयाने आज केली आहे. जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 191 वर पोहोचली आहे.

त्यानुसार मोगणा येथील 75 वर्षीय पुरूष, सातुर्णा येथील 66 वर्षीय पुरुष, तिवसा येथील 65 वर्षीय पुरूष, परतवाडा येथील 64 वर्षीय पुरूष (जिल्हा रूग्णालयात दाखल), ब्राम्हणवाडा थडी येथील 70 वर्षीय पुरूष, जोगळेकर प्लॉट येथील 51 वर्षीय पुरूष, जवाहरगेट येथील 68 वर्षीय पुरूष, विलासनगर येथील 51 वर्षीय पुरूष, शिरजगाव कसबा येथील 56 वर्षीय पुरुष, मोबीन पुरा येथील 70 वर्षीय पुरूष आदी कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कळविले आहे. त्याचप्रमाणे, यापूर्वी निधन झालेल्या सहा कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंदही घेतल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र, त्याबाबतचा तपशील कळू शकला नाही. जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 191 वर पोहोचली आहे.

000