कोरोनाबाबत अफवा चित्रफीत प्रसारित करणारे यांच्या वर विविध कलम,पालक अधिकारी यांनी केली तक्रार शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

0
1092
Google search engine
Google search engine

कोरोनाबाबत अफवा चित्रफीत प्रसारित करणारे यांच्या वर विविध कलम,पालक अधिकारी यांनी केली तक्रार
शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

चांदुर बाजार:-

कोरोना चे थैमान संपूर्ण जगात सुरू असून दररोज लाखो लोकांना याची लागण होत आहे.या साठी प्रशासन शर्ती चे प्रयत्न तसेच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरू आहे.मात्र तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र घेण्यात आलेल्या चाचणी मध्ये रोहित गणेश पोकळे आणि इतर हे पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड सेंटर चांदुर बाजार येथे व डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात अमरावती येथे पाठविले.

त्या ठिकाणी रोहित पोकळे व इतर यांनी स्वतः चे चित्रफीत बनवून सोशल मीडिया समूह माझं गाव विकास समिती 1 शि. क.यावर व्हायरल केले.त्या चित्रफीत मध्ये कोरोना आजार नाही,प्रशासन आपली दिशाभूल करीत आहे.आपले कामधंदे सुरू ठेवा असे व इतर कमेंट करून प्रशासनाचे व गावातील नागरिकामध्ये कोरोना संसगर्जन्य आजाराचे संदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण करून त्यांनी नागरिकांचे जीवितास धोका निर्माण होईल अशी अफवा पसरविली त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास स्थानिक प्रशचे उपाययोजनेस खीळ बसली व गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अश्या पालक अधिकारी शिरजगाव कसबा नंदलाल पतालिया यांच्या तक्रार वरून शिरजगाव कसबा येथे दिनांक 4 सप्टेंबर 2020 ला विविध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून रोहित गणेश पोकळे रा.शिरजगाव कसबा व इतर यांचा शोध घेणे सुरू आहे.तसेच या गुन्ह्याचा तपास शिरजगाव कसबा येथील पोलीस उपनिरीक्षक ढोकणे हे करीत आहे.