जिल्ह्यात गत २४ तासात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

0
3513
Google search engine
Google search engine

*पाच रुग्णांचा मृत्यू*
अमरावती, दि. १२ : जिल्ह्यात गत २४ तासात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.
जिल्हयात अद्यापपर्यंत मयत कोरोनाबधित रुग्णाची संख्या १९६ वर पोहोचली आहे.

पथ्रोट येथील ६८ वर्षीय पुरुष, साईनगर येथील ८५ वर्षीय पुरुष, माऊली जहागीर येथील ६० वर्षीय पुरुष, चांदुर रेलवे येथील ४८ वर्षीय महिला, नांदगाव खंडेश्वर येथील ७० वर्षीय पुरुष यांचा त्यात समावेश आहे.
०००