विशेष पथक आणि ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची जुगार वर रेड 8 आरोपी ,8 मोटारसायकल सह पावणे चार लाखाच्या मुद्देमाल जप्त

0
915
Google search engine
Google search engine

विशेष पथक आणि ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची जुगार वर रेड
8 आरोपी ,8 मोटारसायकल सह पावणे चार लाखाच्या मुद्देमाल जप्त

चांदुर बाजार :-

                            अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांनी तयार केलेल्या विशेष पथक च्या कार्यवाही मुळे अनेक अवैध धंदे करणारे याना चांगली चपराक बसली असून अशी एक कार्यवाही त्यांनी ब्राम्हनवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीत जुगार वर केली.

               विशेष पथक यांनी केलेल्या कार्यवाही मध्ये दि.12/9/2020 रोजी प्रो.जुगार, रेड करणे कामी पेट्रोलिंग करीत असता, गुप्तमाहीतीदाराकडून खबर मिळाली की, आरोपी नामे 1) सुखराम धाडसे  रा मानी 2) रामदास फुलचंद बारस्कर रा सोनोरा 3)  केसर सिंग धाडसे रा बेलकुंड 4) रफिक खान अयुब खान रा  घाटलाडकी वरील नमूद आरोपी हे रेडवा शेतशिवार येथे एका बादशाह वर पैसाचा हार जितचा जुगार खेलताना मीळुल  आले त्याचे ताब्यातून  *नगदी  14,210 ₹ व 02 मोबाईल किंमत अंदाजे 9,500 रुपये व  मोटार सायकल 04 किंमत अंदाजे 1,60,000 असा एकूण1,83,710 /- रु.चा मुद्देमाल* जप्त करून 04 आरोपीसह  पुढील कार्यवाही पो स्टे * ब्राह्मणवाडा * यांचे ताब्यात देण्यात आले आहे

                       ही कार्यवाही पथक – पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हरी बालाजी एन यांचे मार्गदर्शनात
सपोनि अजय आकरे ,पोहवा़ विजय अवचट ,पोना रवीद्र बावणे,नापोका सय्यद अजमत  ,नापोका स्वप्नील तंवर,पो का पंकज फाटे,पो का बाळकृशन ,पो का गौतम,पोका किशोर,म पो का आरती,म पो का पूजा,चालक पोका पंकज वानखडे सोबत पोस्टे  ब्राह्मणवाडा येथील कर्मचारी नापोका सचिन बुजाडे , पोका निलेश डांगोरे,यांनी केली.

        तसेच ब्राम्हनवाडा थडी पोलिसांनि वणी शेत शिवार मध्ये केलेल्या जुगार कारवाही मध्ये आरोपी 1)अब्दुल सादिक शेख हसन वय 65 वर्ष रा.ब्राम्हणवाडा थडी,2)चक्रधर यशवंतराव यावले वय 55 वर्ष रा.ब्राम्हणवाडा थडी,3)मोहन बालकृष्ण निर्गुळे वय 43 वर्ष रा.सुरळी,4)दिनेश देविदास राऊत रा.वणी यांच्या कडून नगदी 19830 ,मोटार सायकल, मोबाईल सह एकूण 163850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

               ही कार्यवाही ठाणेदार सचिनसिह परदेशी ,सहायक पोलिस निरीक्षक अमूल बच्चव,साहेबरवजी राजस,राहुल मोरे,निलेश वासनकर यांनी केली.

दोन कार्यवाही मधील पोलीस टीम सह आरोपी अटक चे फोटो मेल केले आहे.