गोमांस विक्री ,आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याला त्याच्या अटक,महसूल विभाग अनभिज्ञ ठाणेदार गोपाल उपाध्यय यांची धडक कार्यवाही

0
632
Google search engine
Google search engine

गोमांस विक्री ,आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याला त्याच्या अटक,महसूल विभाग अनभिज्ञ
ठाणेदार गोपाल उपाध्यय यांची धडक कार्यवाही

चांदुर बाजार:-

शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल उपाध्यय यांनी दिनांक 12 सप्टेंबर 2020 ला ग्राम शिरजगाव कसबा हद्दीतील आरोपी नाव साहेबखाँ अब्बासखाँ वय 59 वर्षे रा. शिरजगाव कसबा याच्या राहत्या घरी गुप्त माहिती च्या आधारे रेड केली असता त्याच्या ताब्यातून 44 किलो बंदी असलेले गौमाश तसेच इतर साहित्य ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली.

या कार्यवाही मध्ये आरोपी कडून 10120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर त्याच्या साथ रोग अधिनियम,महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत विविध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

दिनांक 12 च्या सायंकाळी पाळा रोडवरून अवैध पणे वाळू ची वाहतूक करणाऱ्या शिरजगाव कसबा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची विचारपूस गेली असता ट्रॅक्टर मालक आणि मजूर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या कार्यवाही मध्ये आरोपी डगलू उर्फ श्रीराम कळीराम मावस्कर वय 25 वर्ष रा पाळा अधिक 5 असे 6 आरोपी वर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

अवैध वाळू वाहतूक करताना पोलिसांनी आरोपी च्या ताब्यातून 1ब्रास रेती,ट्रॅक्टर क्र MH 29 V4816 व ट्रली, एक जुना वापरता मोबाईल असा एकूण 4,08,000 रु चा मुद्देमाल जप्त केला.ही कार्यवाही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन,अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे,अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदगिरे याच्या मार्गदर्शन खाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्यय (ठाणेदार शी.कसबा)पोलीस हेड कॉस्ट. मुडे ,पोलीस स्टेशन खुफिया अंकुश अरबत,राहुल खर्चन आणि त्याच्या टीम ने केली.

चौकट
शिरजगाव कसबा महसूल मंडळ मध्ये 1 मंडळ अधिकारी 6 तलाठी 6 कोतवाल असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू आहे मात्र याबाबत महसुल विभाग सर्व काही माहिती असून अनभिज्ञ असल्याचे सोग कश्यासाठी करीत आहे.अशी चर्चा या महसूल मंडळ मध्ये सुरू आहे.तर शिरजगाव कसबा या ठिकणीच 5 -7 जण हे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आणि गौण खनिज ची वाहतूक करतात.