विविध शैक्षणिक मागण्यांसाठी युवासेनेचे निवेदन…

194
जाहिरात

आकोटः ता.प्रतीनिधी

युवासेनेच्या वतीने शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विविध शैक्षणिक मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले, ऍडमिशन असो किंवा जास्त प्रमाणात फी आकारणी असो किंवा प्रवेशित जागा असो..तसेच लॉक डाऊनमुळे ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन फॉर्म किंवा सेमिस्टर फॉर्म भरला नसेल अशा विध्यार्थ्यांचा सुद्धा फॉर्म भरण्यात यावा.. अशा अनेक विषयांसंदर्भात निवेदनाद्वारे शिवाजी महाविद्यालय प्राचार्य कुलट सर यांच्याकडे देण्यात आले.

चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात कुठलीही अट न ठेवता प्रवेशाची तारीख वाढवून जागा वाढवून विध्यार्थ्यांना प्रवेश द्यावा.आदी मागण्या करण्यात आल्या
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक तथा युवासेना उपजिल्हाप्रमुख राहूल कराळे मुकेश निचळ( जिल्हा समन्वय ) रोशन पर्वतकार. कुणाल कुलट ( तालुका संघटक )
अक्षय घायल( शहर प्रमुख ) अंकुश कुलट( उपतालुका प्रमुख )
विजय भारसाकळे(सचिव) विशाल चौधरी (ता. समन्वयक)
गौरव हिंगणकर ( उपतालूका प्रमुख ) विशाल कुलट( प्रवक्ता )
गौंविद चावरें( उपशहर प्रमुख ) पंकज धांडे( उपतालुका प्रमुख )
वैभव जगताप (काॅलेज कक्ष प्रमुख)
संतोष तायडे (तालुका चिटणीस) शिवा रेळे (काॅलेज प्रमुख) सागर उगले(जि. प सर्कल प्रमुख) निलेश मोगरे, सुचक भांबुरकर, स्मित भगत, विठ्ठल रेळे, अभिषेक देशमुख ओम काळनाथे, अवी पाटिल, गोलु भोवळे, तसेच युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच युवासैनिक उपस्थित होते.