लोकजागर मंच तर्फे डेंग्यु नाशक फवारणी

0
2736

अकोटःसंतोष विणके

डेंगूची लक्षणे व उपायांबाबत माहितीपत्रक वितरण

अकोट मधील सरस्वती नगर,यशोदा नगर, महालक्ष्मी कॉलोनी, स्वामि समर्थ महाराज मंदिर भागात डेंग्यूने कमालीचे थैमान घातले होते. सदर भागात डेंग्यूचा प्रादुर्भावामुळं प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लोकजागर मंच द्वारा बुधवारी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक डेंगू नाशक फवारणी करण्यात आली. स्वामी समर्थ महाराज मंदिर आतमधील परीसर तथा बाह्य भागात डेंग्यू नाशक फवारणी करण्यात आली.

या वेळी डेंग्यू काय आहे, त्याची लक्षणे तथा त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय या बद्दलची माहिती छापलेले पत्रके नागरिकांना वाटण्यात आले.
सदर भागातील नागरिकांनी लोकजागर मंचच्या रचनात्मक कामांचे नेहमी प्रमाणे स्वागत केले तथा धन्यवाद दिले.व परिसरात साफ स्वच्छता पाळून डेंगू तथा इतर आजारांपासून दक्ष राहण्याबाबत जनजागृत करण्यात आले.