सोनु चौक ते जयस्तंभ चौक विद्युत खांब स्थानांतरणास सुरुवात

0
1102
Google search engine
Google search engine

सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांचे भाजप गटनेता गजानन लोणकरांनी मानले आभार

अकोटःसंतोष विणके

अकोट न.पा. प्रभाग क्र. ६ मधील सोनू चौक ते जयस्तंभ चौक या मुख्य बाजारपेठेत नव्याने संपूर्ण विद्युत खांब स्थानांतरण कामास सुरुवात झाल्याने या परिसरातील धोकादायक खांब हटणार आहेत. या कामादरम्यान व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनास केलेल्या सहकार्याबद्दल खा. संजय धोत्रे यांचे स्वीय सहाय्यक तथा गटनेता गजानन लोणकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावरील खांब हे धोकादायक झाले होते तसेच अनेक ठिकाणी अनावश्यक विद्युत तारांचे जाळे निर्माण झाले होते मुख्य बाजारपेठ व मिरवणूक मार्ग असल्याने विद्युत तारांमुळे धोकादायक परिस्थिती झाली होती. मात्र नव्याने होणाऱ्या विद्युत खांब स्थानांतरण यामुळे आता बर्‍याच अंशी मुख्य बाजारपेठ मोकळा श्‍वास घेणार आहे

विशेष म्हणजे या कामा दरम्यान टेलीफोनचे अनावश्यक खांबसुद्धा हटविण्यात येत असल्याचे कळते आहे.एकंदरीतच अकोट शहरातील संपूर्ण मिरवणूक मार्गासह मुख्य बाजारपेठेतील विद्युत खांब हटवले गेल्यास हे सर्व मार्ग मोकळा श्वास घेऊन उत्सव काळातील समस्या सुटू शकते.