अकोला पोलीसांची कोरोना संक्रमणा विरुद्ध व्यापक मोहीम… नो मास्क नो पेट्रोल नंतर आता नो मास्क नो बुक्स…

0
1850
Google search engine
Google search engine

अकोलाःसंतोष विणके

अकोला पोलीस व चिव चिव बाजार पुस्तक विक्रेत्यांचा उपक्रम

अकोला शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढता असून करोना संक्रमणा पासून वाचण्यासाठी लोकांनी नियम पाळावेत म्हणुन व्यापक मोहीम सुरु केली आहे.याअंतर्गत नो मास्क नो पेट्रोल नंतर आता नो मास्क नो बुक्स चा नियम पाळल्या जाणार आहे.याआधी अकोला पोलीसांनी नो मास्क नो पेट्रोल मोहीम धडाक्यात राबवली आहे.कोरोना विरुद्ध जागतिक आरोग्य संघटना व आयुष् मंत्रालय भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करणे ह्या शिवाय पर्याय नाही लॉक डाऊन दीर्घ काळ सुरू ठेवता येणार नाही, मागील काळात झालेल्या लॉक डाऊन मुळे भारतीय अर्थव्यवस्था पुरती मोडकळीस आल्याने परत लॉक डाऊन ची वेळ येऊ न देणे हेच चांगले परंतु अनलॉक च्या काळात सर्व सामान्य नागरिकांनी जी काळजी घेणे आवश्यक आहे.

ती काळजी बरेच नागरिक घेत नाहीत हे प्रत्येक ठिकाणी होत असलेल्या गर्दी व सामाजिक अंतर न ठेवता मास्क न घालण्याची सवय पाहता परत आपला प्रवास लॉक डाऊन कडेच सुरू असल्याचे दिसते आहे.

ह्यासाठी अकोला पोलिसांनी सर्व सामान्य नागरिकां मध्ये जण जागृती करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली असून पेट्रोलियम डिलर्स च्या सहकार्याने नो मास्क नो पेट्रोल डिझेल नंतर आता चिव चिव बाजार येथील पुस्तक विक्री च्या दुकानावरील गर्दी लक्षात घेता चिव चिव बाजार येथील पुस्तक विक्रेता संघटनेच्या सहकार्याने नो मास्क नो बुक ह्या मोहिमेची सुरवात करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सर्व पुस्तक विक्रेत्यांना मार्गदर्शन केले त्यांनी उस्फुर्त सहकार्य देऊन स्वयंस्फूर्तीने सर्व दुकानावर नो मास्क नो बुक्स चे फलक लावून ग्राहकांना मास्क घालण्याचा आग्रह धरत विना मास्क येणाऱ्या ग्राहकाला पुस्तके विक्री न करण्याचा निर्णय घेतला व गरज पडल्यास मास्क सुद्धा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली तसेच खरेदी करतांना सामाजिक अंतर राखण्याची खबरदारी सुद्धा घेण्यात येईल असे ठरविले आहे. चिव चिव बाजार पुस्तक विक्रेता संघाचे अकोला पोलिसांनी अभिनंदन केले असून असाच पुढाकार, सर्व प्रकारचे व्यापारी, डॉक्टर्स, किरकोळ विक्रेते ह्यांनी स्वयंस्फूर्तीने घ्यावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे।