अमरावती जिल्ह्यात वाळू तस्कर सुसाट; जिल्हा प्रशासन झटकत आहे जबाबदारी 2 वर्षा पासून वाळू घाट लिलाव नाहीच

0
987
Google search engine
Google search engine

अमरावती जिल्ह्यात वाळू तस्कर सुसाट; जिल्हा प्रशासन झटकत आहे जबाबदारी
2 वर्षा पासून वाळू घाट लिलाव नाहीच,

अमरावती

                      गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यामध्ये वाळू उपशाचे त्रांगडे झाले असून, जिल्ह्यातील एकाही वाळू घाटातून उपसा करण्यास परवानगी नाही तरीही अवैधरित्या उपसा करून जिल्ह्यातील तालुक्यातील विविध ठिकाणी वाळूचे साठे करून ठेवण्यात येत आहेत. महसूल विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याचे सोग घेत आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील तालुक्यातील होणाऱ्या  अवैध वाळू उपसा वरून दिसून येते.

                               जिल्ह्यात इतर गौणखनिजांबाबतही फारशी स्थिती वेगळी नाही. अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर चांदुर बाजार तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील परिसरातील डोंगर तसेच खदानींमधून गौणखनिजांचा सर्रास उपसा करण्यात येत आहे. या प्रकाराला चाप बसवण्यासाठी प्रशासाकडून महिन्याला सरासरी २५ कारवाया करण्यात येत असल्याचे शासन दप्तारातील नोंद सांगते. वाळूचोरी, अवैध खदानींबद्दल मुख्यालयात झालेल्या प्रत्येक बैठकांमध्ये अधिकाऱ्यांची खरडपट्टी होत असली तरी, गौणखणिजाची चोरी रोखण्यात प्रशासनाला पूर्णपणे यश आलेले नाही. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात किंवा लपवून शेतात  परिसरात अनेक ठिकाणी अवैध वाळूसाठा करण्यात येत असून येथून वाळूची विक्री करण्यात येते.
तालुक्यात बेकायदा साठा करण्यात येणाऱ्या वाळूबाबत महसूल  प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असताना कुठेही जप्तीची कारवाई होत नाही.

चौकट
चिरीमिरी जोरात……………..

गेल्या काही वर्षांपासून वाळू उपशाचे जिल्ह्यात त्रांगडे आहे. भरमसाठ दरामुळे ठेकेदार पुढे येत नाहीत. पर्यायाने चोरी करण्याचा सोपा मार्ग तस्करांनी अवलंबला आहे.तसेच तालुक्यातील अनेक शासकीय कामावर चोरीच्या वाळूचा वापर होत आहे. जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील वाळू घाट काही वर्षा पासून लिलाव झाला नाही, मात्र अवैध उपसा जोरदार सुरू आहे. वाळू लिलावामध्ये सहभागी न होता चिरीमिरी देऊन वाळू तस्कर सर्रास शहरात वाळू विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र आहे.तर याबाबत प्रतिनिधी ने जिल्हा महसूल प्रशासन सोबत संपर्क केला असता त्यांनी आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकली असल्याचे दिसून आले.तर जिल्हा खनिकर्म यांना वारंवार संपर्क करून देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

*प्रतिक्रिया*

गौण खनिज ,लिलाव बाबत ची माहिती आरडीसी कडे आहे आपण त्याच्या कडूनच ती माहिती घ्या.

1)  डॉ . स्नेहल कनीचे उपजिल्हाधिकारी महसूल विभाग अमरावती

2)याबाबत तुम्ही जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची प्रतिक्रिया घ्या असे म्हणत निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी  प्रतिनिधी सोबत संपर्क कट केला.