वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले निर्देश – राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी ! 

0
488
Google search engine
Google search engine
वरुड तालुक्यात वादळ वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ! 
वरुड तालुका प्रतिनिधी /
        वरुड तालुक्यात वादळ वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, एकीकडे कोरोणाचे संकट तर दुसरीकडे पावसामुळे परीसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात वरुड तालुक्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागाला झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
        वरुड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. वरुड तालुक्यात सलग एक तास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्यामुळे शेत शिवारात संत्रा, ज्वारी, मिरची, कापूस, सोयाबीन ह्या नगदी पिकांचे नुकसान होवून शेतकऱ्यांचा शेतात पावसाचे पाणी साचून तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
       परिसरात वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी होऊन मोठे नुकसान झाले आहे. यात संत्रा, ज्वारी, सोयाबीनसह  विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालेल आहे. महसूल व कृषी विभागाने वरुड तालुक्यात पडलेल्या वादळ वा-यासह पावसामुळे संत्रा, सोयाबीन, ज्वारी पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून, वादळी वारा व जोरदार पाऊसामुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिल्यामुळे  वादळी वारा व पावसामुळे लोणी परिसरातील पिक नुकसानीची पाहणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळू कोहळे पाटील, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, ऋषिकेश राऊत, सुमित गुर्जर, सतीश पाटणकर, पंचायत समितीचे तालुका कृषि अधिकारी राजू साळवे, तलाठी जंगले, राहुल महल्ले, राजेंद्र भुयार, वसंतराव बारस्कर, अतुल लोखंडे, नीलेश वानखडे, धीरज धर्मे, सुमित निंबोरकर, निखिल पाचघरे, विपुल पाचघरे, ईश्वर सोनारे, हैबत लोखंडे, प्रदीप क्षिरसागर, राजु मालपे, प्रमोद आगरकर, पंकज निभोरकर, विक्की बडघे, भूषण पोहरकर, सूरज पाजनकर, अतुल क्षीरसागर यांच्यासह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.