कोरोना योद्धा पेंटिंग स्पर्धा विजेत्यांचा पोलीस अधीक्षक जी, श्रीधर ह्यांचे हस्ते गौरव

0
1007
Google search engine
Google search engine

अकोलाःसंतोष विणके

दोन गटात एकूण 6 विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान

करोना योद्धा पेंटिंग स्पर्धा विजेत्यांचा पोलीस अधीक्षक जी, श्रीधर ह्यांचे हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोनाशी लढत असलेल्या करोना योध्यांचा सन्मान व्हावा व युवा चित्रकारांना त्यांच्या कलेतून करोना योध्यांचे चित्ररूपी कार्य सर्व समाजा समोर यावे म्हणून पोलीस मुख्यालयाच्या आवार भिंतीवर भव्य अश्या करोना योद्धा पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..

या स्पर्धेला ढोणे चित्रकला महाविद्यालय, रोटरी क्लब अकोला, दिव्यान्ग आर्ट गॅलरी, जे सी आय न्यू प्रियदर्शनी अकोला ह्या संस्थेची मदत झाली होती , ह्या मध्ये बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाच्या एकूण 19 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भित्ति चित्रे काढली होती, त्याचे परीक्षण करण्यात येऊन दोन गटातील एकूण 6 स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात आले तसेच दोन्ही गटात एका स्पर्धकाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले ,परितोषिका मध्ये सन्मान चिन्ह व प्रमानपत्राचा समावेश होता,

गट क्रमांक एक मध्ये प्रथम प्रतीक वाघ, द्वितीय दीपाली वखारे, तृतीय रतन लोखंडे व उत्तेजनार्थ कल्याणी वर्मा हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले

तर दुसऱ्या गटात प्रथम पूजा वानरे, द्वितीय हेमंत उपरिकर, तृतीय श्रद्धा जोध व उत्तेजनार्थ तुषार नकाशे ह्यांना पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे हस्ते व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, रोटरी क्लब अकोला चे अध्यक्ष घनश्याम चांडक, प्रेम किशोर चांडक, प्रमोद कराळे, ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे, जे सी आय न्यू प्रियदर्शनी अकोला च्या अध्यक्ष श्रीमती आरती पनपालिया ह्याचे प्रमुख उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आले तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले ,

कार्यक्रमाचे नियोजन व संचालन सदर प्रकल्पाचे प्रमुख शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले. कोरणा योद्ध्यांचे कार्य चित्र रूपातून भिंतीवरती जिवंत करणारा हा उपक्रम राज्यातील अनोखा उपक्रम म्हणून चर्चिला जातोय