भारतीय जन संचार संस्थेचे प्रा.डॉ. देवानंद गडलिंग यांचे दु:खद निधन

552
जाहिरात

अमरावती: भारतीय जन संचार संस्थेच्या अमरावती प्रादेशिक केंद्रात कार्यरत प्रा. डॉ. देवानंद गडलिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री दू:खद निधन झाले. ते 42 वर्षांचे होते.

गेल्या नोव्हेंबरलाच संस्थेत रुजू झालेले प्रा. गडलिंग एक मनमिळावू शिक्षक म्हणून विद्यार्थ्यामध्ये अल्पावधित प्रिय झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडिल, भाऊ व तीन बहिणींसह बराच मोठा आप्त परिवार आहे.
“डॉ. गडलिंग यांच्या रुपाने संस्थेने एक होतकरू शिक्षक गमाविला असून भारतीय जन संचार संस्था गडलिंग परिवाराच्या दू:खात सहभागी आहेत,” अशा शब्दात प्रादेशिक संचालक विजय सातोकर यानी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
……