आकोली जहाँगीर येथे भव्य रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद:33 रक्तदात्यांचा सहभाग

0
411
Google search engine
Google search engine

न्यु भिमराजे धम्मसेवा मंडळाचा उपक्रम

अकोट : प्रतीनीधी
सध्याची कोरोना महामारीची परिस्थिती पाहता आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण कमी करण्यासाठी तसेच रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी तालुक्यातील आकोली जहाँगीर येथे न्यु भिमराजे धम्मसेवा मंडळ तथा अकोला थॅलेसिमीया सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबीरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.शिबीराचे उद्घाटन जि.प.समाज कल्याण सभापती आकाश सिरसाट यांनी केले.तर अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड,पोलीस पाटील नागोराव सोनोने,अंबिरराव मोरे, हरिदास बघेले,ग्रा.पं.सदस्य प्रदिप जाणले,सुरज किटके,मनिष बंगाळे,देवानंद गोठवाड,दिनेश बोचे,सम्राट अशोक सेनेचे आकाश सिरसाट,छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेचे ललित नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन दुर्योधन भेले तर आभार धम्मपाल यांनी मानले.
अकोला येथील साईजिवन रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलन केले.तसेच आकोली जहाँ.चे डाॅ.सचिन गणगणे,
डॉ.के.एस.जयस्वाल यांनी सेवा दिली.रक्तदान शिबीरात राहुल वानखडे,नागेश आठवले,निखील नगराळे,अजिंक्य पाटील,अमोल माळवे,राजकुमार,सोनोने,अंकुश आठवले,शिवराम नागोरे,प्रेमदास ढोले,शिवम कणसरे,आकाश बागळे,विशाल सदाशिव, नागेश सोनोने,पंकज वानखडे,प्रविण सोनोने,जयकुमार वानखडे,प्रदिप कांबळे,पंकज बोरोडे,मोहन वाकपांजर,चंद्रशेखर कैकाडी,रामू सोनोने,श्याम लटकुटे,निशीकांत सोनोने,ऋषिकेश मेहेरे,संतोष सोनोने,संजय घोडीले,नागोराव सोनोने,संतोष रिंगणे,गणेश डवंगे,शंभू सोनोने आदींनी रक्तदान केले.
शिबीराच्या यशस्वितेसाठी न्यु भिमराजे धम्मसेवा मंडळाचे अमोल सोनोने,उमेश तायडे,नितेश पोहरकार,परम आठवले, आकाश सोनोने,रोशन चौथमल, निलेश सोनोने यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.