जवाहर रोड झाला प्रशस्त व मोकळा…पालीकेने हटवले अडथळा ठरणारे विद्युत खांब

0
1119
Google search engine
Google search engine

अकोटःसंतोष विणके

आकोट शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या छ.शिवाजी महाराज चौक ते सोनु चौक दरम्यान वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्यृत खांब विद्यृत वितरण कंपनी मार्फत पालीकेव्दारा काढण्यात आले त्यामुळे मार्ग मोकळा व प्रशस्त झाला असुन वाहतुक सुरळीत होणार आहे.गेल्या अनेक वर्षापासुन असलेली विद्यृत खाबांची समस्या यामुळं निकाली निघाली आहेआकोट शहराची मुख्य बाजारपेठ छ.शिवाजी चौक ते जयस्तंभ दरम्यान वसलेली आहे. या मार्गावर गेल्या तिन, साडेतीन दशका अगोदर रोड डिवाडर टाकुन विद्यृत खांब उभारण्यात आले होते,त्यावर पथदिवे बसविण्यात आले परंतु सदर डिवाडर मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता म्हणुन डिवाडर तोडण्यात आले परंतु रस्त्यामधिल विद्यृत खांब काढण्यात आले नाहीत, वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्यृत खांबही काढण्यात यावे अशी मागणी शहरवासी करीत होतेपरंतु त्या खांबावर ११ के.व्ही व एल.टी लाईन असल्यामुळे खांब काढणे शक्य होत नव्हते.मात्र पालीकेने हे आव्हान पेलले, शहरवासीयांची ब-याच वर्षापासुनची मागणी पुर्ण करीत छञपती शिवाजी महाराज चौक ते सोनु चौक,सोनु चौक ते जयस्तंभ चौक,

सोनु चौक ते गवळी पुरा,
सोनु चौक ते टेलीफोन आॕफीस या मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारे,खराब झालेले, खांब विद्यृत वितरण कंपनी मार्फत काढण्यात आले आहेत तसेच रस्याच्या दोन्ही बाजुला विद्यृत खांब उभारण्यात आले आहेत. परिणामी मिरवणुकीच्या वेळी रस्त्याच्या मध्ये लोंबकळणा-या विद्यृत तारांची समस्या या परिसरापुरती तरी निकाली निघाली आहे. आकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एम.व्हि. आकोटकर,विद्यृत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ऐ,डि उईके, उपकार्यकारी अभियंता जि.एस अग्रवाल, सहाय्यक अभियंता ए.आर. जाधव यांचेसह अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने पुर्णत्वास जात आहे.तर शहर पोलीस निरिक्षक संतोषजी महल्ले यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.