अकोला पोलिसांच्या नो मास्क,… नो सवारी मोहीमेची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल…

1076

अकोलाःसंतोष विणके

अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहरात सर्व सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी विविध प्रकारे नो मास्क मोहीम राबवत आहेत.यातीलच अकोला पोलिसांच्या नो मास्क नो सवारी मोहीमेची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले असून सदर मोहीम राज्यस्तरावर राबवण्यात बाबत विचार करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या व्ही सी द्वारे घेतलेल्या बैठकीत सांगितले.अकोला शहरात धावणारे जवळ पास 2000 ऑटो वर नो मास्क नो सवारी चे पोस्टर्स लावण्याची मोहीम अकोला पोलिसांनी शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून सुरू केली आहे,सवारी मास्क घालण्यासाठी तयार नसल्यास अशी सवारी ऑटो मध्ये बसवून घेऊ नये, त्याला ऑटो चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला,शहरात दररोज जवळपास 2000 ऑटो धावत असल्याने ह्या मधून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात,ह्या मोहिमेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना प्रबोधन करणे शक्य असल्याने ही मोहीम शहर वाहतूक शाखे कडून शहरात राबविण्यात येणार आहे.दिलेल्या सुचनेचे पालन त्या साठी पहिले दोन दिवस ऑटो चालकांची शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या अंतर्गत सर्व ऑटो चालकांनी स्वतः मास्क घालावे व ऑटो मध्ये प्रवास करणाऱ्या सवारी ला सुद्धा मास्क घालणे बंधनकारक करावे ,

दिलेल्नया सुचनांचे पालन न करणाऱ्या ऑटो चालकांनी दंडात्मक कारवाईस तयार राहावे असा इशारा सुद्धा वाहतूक शाखेने दिला आहे, ऑटो चालकांना सूचना दिल्या नंतर आज शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे उपस्थिती मध्ये ऑटो वर” नो मास्क नो सवारी” असा उल्लेख असलेले पोस्टर्स लावणे सुरू केले आहे.

सदर पोस्टर्स साठी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे खंडेलवाल ह्यांचे सहकार्य लाभले,येत्या 2 दिवसात शहरातील जवळपास 1200 ऑटो वर असे पोस्टर्स शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी लावणार असून सूचना न पाळणाऱ्या ऑटो वर कारवाई आरंभ होणार आहे.

जाहिरात