मरळवाडी येथील ग्रामस्थांचे रेशन वाटप अनागोंदी कारभारा विरुद्ध उपोषण

0
631
Google search engine
Google search engine

भाजयुमोचे बीड जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे यांनी घेतली उपोषणकर्तेंची भेट

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी दि.२८ :- तालुक्यातील मौजे मरळवाडी येथील स्वस्त धान्य वाटपाच्या अनागोंदी कारभारा विरूद्धात तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषण कर्तेंची लोकनेत्या मा.पंकजा ताईसाहेब मुंडे व खा. डॉ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे बीड जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे यांनी भेट घेत तहसीलदार यांच्याशी चर्चा करून मरळवाडी येथील राशन वाटपाचा प्रश्न तात्काळ सोडवून उपोषणकर्त्याच्या मागणी संदर्भात चर्चा करण्यात आली आहे.


याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी तालुक्यातील मरळवाडी गावच्या ग्रामस्थांना तेथील रेशन दुकानदार रेशन देत नसून त्यांच्या हक्काचे रेशन मध्ये अपहार करून अनागोंदी कारभार करत आहेत. परळी तहसील कार्यालयात या महिन्याच्या 8 तारखेला याच राशेन दुकानदाराच्या विरोधात लिखित तक्रारी दिल्या असून अद्याप या गावकऱ्यांना त्यांच्या मालापासून वंचित ठेवण्याचे काम या रेशन दुकादाराकडून केल्या जात आहे.
अंत्योदय व बीपीएल कार्ड धारकांना सुद्धा त्यांना त्यांचा माल 5 ते 10 किलोच मोठ्या मुश्किलीने दिला जातो, याच दुकानदाराकडे जवळपास 13 मृत व्यक्तीचे अद्याप नावे कमी केली नसून त्यांचा ही माळ हा दुकानदार कित्येक वर्षापासून उचलत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकानी केला आहे. लॉकडाऊन च्या काळात केंद्रसरकारने प्रत्येक ऑनलाइन रेशनकार्ड धारकास त्याच्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे व तेवढाच माल सरकार कडून फ्री देण्याचे आदेश असतांना ही या रेशन दुकानदाराने मरळवाडी गावच्या ग्रामस्थांना माला पासून वंचित ठेवले मशीनवर अंगठा लावला जातो मात्र त्याची पावती दिली जात नाही तसेच विचारणा केली असता तहसील ला जाऊन पावत्या घ्या म्हणतो . या भयाण दुष्काळ परिस्थियीत अन्नापासून वंचित ठेवण्याचे काम केल्याच्या विरोधात मरळवाडीच्या महिला व पुरुषांनी आज सोमवार, दि.28 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसले आहेत. बालासाहेब किशन फड, दयाराम श्रीहरी आघाव, वाल्मिक नामदेव आघाव, महादु नामदेव आघाव, प्रल्हाद नामदेव आघाव या सर्व प्रमुख उपोषनकर्त्यांची भाजयुमोचे बीड जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे यांनी भेट घेतली. तसेच या विषयी तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न तात्काळ निकाली काढून अशा कोरोना महामारीत गोरगरीबांचे राशन पळविणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करून उपोषनकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.