शिराढोण पोलिसांच्या गळाला आणखीन एक बुलेट !

0
614
Google search engine
Google search engine

शिराढोण पोलिसांच्या गळाला आणखीन एक बुलेट !


उस्मानाबाद / प्रतिनीधी

सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण पोलीसांच्या धाडशी कारवाया होत असल्याचे पाहयला मिळत आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी एक आरोपी बुलेट मोटारसायकल सोबत पकडला होता.त्याच्याकडून आणखीन एक बुलेट विकल्याचा उलघडा झाला .
त्याचा शिराढोण पोलीसांनी लागलीच धागेदोरे घेण्यास सुरवात करुन परभणी येथुन एक बुटेट लाब्यात घेऊन शिराढोण पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की,
तक्रारदार सुनील बन्सी कापसे रा गौरगाव ता कळंब यांची क्लासिक इनफिल्ड बुलेट मोटर सायकल चोरी गेली होती तिचा शोध घेत असताना भूम येथील आरोपी नामे राजू अर्जुन काळे यास अटक केली होती त्याने सदरची मोटरसायकल चोरून परभणी येथील आरोपी यास दिली होती आम्ही परभणी येथे जाऊन आरोपीचा व बुलेट मोटरसायकलचा शोध घेतला असता सदर आरोपी मिळून आला नाही त्याच्या घरासमोर सदरची मोटरसायकल बुलेट हे लागलेली दिसली याची आम्ही खात्री करता सदरची मोटरसायकल ही या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली सदर ठिकाणाहून मोटरसायकल बुलेट ही जप्त करून पोलीस स्टेशन शिराढोण येथे हजर केले हि कारवाई.
पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन उस्मानाबाद अप्पर पोलीस अधिक्षक संदिप पालवे उपविभागीय पोलीस अधीकारी सुरेश पाटिल , शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक शौकत पठाण व त्यांचे मदतनीस सुनील तारळकर हे करत आहेत सोबत पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचारी अधिकारी व सोबत होमगार्ड या सर्वांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे या कार्यवाहीचे उस्मानाबाद जिल्ह्यात शिराढोण पोलीसांचे कौतुक होत आहे.