शहर वाहतूक शाखेद्वारा नो मास्क मोहीमेत मास्क वाटपासह दंडात्मक कारवाईचा धडाका

0
825

अकोलाःसंतोष विणके

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या अंमलबजावणी साठी अकोला शहर वाहतूक शाखेकडून नो मास्क नो सवारी,मोहिमे अंतर्गत मास्क वाटप सह नियम न पाळणाऱ्यां विरोधात दंडात्मक कारवाईची धडाका सुरु आहे या अंतर्गत आतापर्यंत
अकोला शहरातील 370 हून अधिक विना मास्क ऑटो चालकांना दंड आकारण्यात आला असून 600 च्यावर मोफत मास्क वाटप करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक जी श्रीधर व शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनात नो मास्क नो सर्व्हिस अंतर्गत शहर वाहतूक शाखेने वेगवेगळ्या मोहिमा सुरू केल्या आहेत वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या शासनाच्या मोहिमे अंतर्गत त्याचाच एक भाग म्हणून अकोला शहरातील ऑटोची प्रचंड संख्या लक्षात घेता” नो मास्क, नो सवारी ” ही मोहीम मागील 4 दिवसा पासून शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचारी राबवित आहेत,

आता नुसतेच ऑटो वर कारवाई करण्या पुरती ही मोहीम मर्यादित न ठेवता निर्देश न मानणाऱ्या ऑटो वर कारवाई, मोहिमेचा उद्देश जास्तीत जास्त नागरिकां पर्यंत पोहचवा म्हणून शहरात धावणाऱ्या जवळपास सर्व ऑटो वर पोस्टर लावणे व गरीब, मजूर, सायकल रिक्षा चालविणारे, बाहेर गावा वरून विना मास्क येणारे प्रवासी ह्यांना मास्क वाटप अशी तिहेरी मोहीम शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यां नी सुरू केली असून आता पर्यंत 370 विना मास्क ऑटो चालविणाऱ्या किंवा विना मास्क सवारी वाहून नेणाऱ्या ऑटोवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, जवळपास 1100 ऑटोवर आता पर्यंत नो मास्क नो सवारी व माझे कुटुंब माझी जबाबदारी असे घोषवाक्य लिहलेली पोस्टर्स चिपकविण्यात आलेत तर आता पर्यंत जवळपास 600 मास्क वाटप करण्यात आली आहेत,

पोस्टर्स देण्यात विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, साई फ्लेक्स चे जितेंद्र मिटकरी, कॉटन सिटी 90.40 चे संचालक डॉक्टर गणेश बोरकर, मास्क साठी भारतीय जनता पार्टी च्या अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते शरद कोकाटे, ठाकुरदास चौधरी, विनोद राठोड ह्यांनी सहकार्य केले, पोस्टर्स व मास्क देणाऱ्या सर्वांचे शहर वाहतूक शाखा प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आभार व्यक्त करून शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होई पर्यंत पोलिसां कडून ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगितले।