अकोटमधील तरुणाने संगीतबद्ध केलेल्या गीताचा महाराष्ट्रात धुमाकूळ–

0
2666
Google search engine
Google search engine

हजारो लाईक्ससह शेअर्सचा पाऊस

आकोटःसंतोष विणके

अकोट येथील युवा कलावंत के.मंगेश या तरुणाने संगीतबद्ध केलेले एक मराठी गीत नुकतेच रिलीज झाले आहे. हया गीताला सोशल मिडीयावर तुफान प्रतिसाद मिळत असुन ७ दिवसातच ६० हजार हुन आधिक लोकांनी पाहले असुन मंगेशवर हजारो लाईक्सचा पाऊस दररोज पडतो आहे.

अकोटच्या तरुणाईने बनवलेल्या या गीताला सोशल मिडीयाने अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. विशेष म्हणजे या गीतातील बहुतांशी चित्रीकरण हे अकोट जवळील सातपुडा पायथा परिसरात झाले असल्याची माहीती के.मंगेश याने दिली.

महाराष्ट्रातील तरुणाई मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या गीताने अवघ्या काही दिवसात महाराष्ट्राला वेड लावलं आहे.या गीताचे दिग्दर्शन, संगीत,व सिनेमॕटोग्राफी स्वतःची असल्याचे के मंगेश ह्यांनी सांगतले.तर गीत संजय दवने.हयानी लिहले आहे व यातील कलावंत अमोल वहाने,पुजा खैर,राहुल कराळे आहेत.के.मंगेश ह्याचे लवकरच,, राडा,काॅलेजगीरी, हे मराठी व अभीमन्यु व प्यार तेरा हे हीदीं चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.एका छोट्याशा तालुक्यातील या प्रतीभावंत कलावंताचे संपुर्ण महाराष्ट्रात कोतुक होत आहे..