कृषीसहसंचालक यांचे गावसभेत मार्गदर्शन

0
1149

ग्राम टाकळी धारव येथील गावसभेत मा. विभागीय कृषीसहसंचालक यांचे मार्गदर्शन

शेगांव -(टाकळी धारव) गावातील शेतीचा सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी ,कर्मचारी व कृषीतज्ञ यांचा सहभाग असलेली ग्राम कृषि विकास समिती गठीत करणे व मार्गदर्शन करण्या संदर्भात दि.०२ ऑक्टो.२०२० रोजी मौजे टाकळी धारव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री ह्यांची जयंती चे औचित्य साधून विशेष गाव सभा घेण्यात आली सदरील गावसभेस माननीय विभागीय कृषी सहसंचालक श्री सुभाषजी नागरे साहेब अमरावती यांनी शासन निर्णय नुसार ग्रामकृषी विकास समिती स्थापना आणि श्री नानाजी देशमुख कृषिसंजीवनी योजने अंतर्गत येणारे विविध घटक करिता गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या अनुषंगाने ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करणे,विविध योजना व पोकरा प्रकल्प इत्यादी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले .त्याच प्रमाणे उत्पादन खर्च कमी करण्याकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील दर्जेदार बियाणे वापरण्या करिता त्यांनी स्वतःकडील उपलब्ध असलेल्या वाणांचे बीजोत्पादन करण्यासाठी विशेष माहिती दिली. आणि “पिकेल ते विकेल” या स्मार्ट अभियान अंतर्गत शेतकरी हा घटक समोर ठेऊन ग्राम कृषि विकास समितीने करावयाचे कार्य या बाबीवर त्यांनी विशेष भर दिला.जेणे करून शेती व्यवसायाशी निगडित हवामानातील बदल,लहरी पर्जन्यमान,कीड व रोग ,सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध होणे, शेतीमालाच्या दरामध्ये घसरण इत्यादी कारणामुळे शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळेल याची सुसंगत परिस्थिती निर्माण करण्यास मदत होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला . या कार्यक्रमानंतर मा. नागरे साहेब यांनी श्री जिग्नेश भायानी यांची पोकरा अंतर्गत पेरू फळबाग लागवड आणि श्री भास्करराव देशमुख यांचे सोयाबीन बीजोत्पादन क्षेत्रास भेट देऊन पाहणी केली . कार्यक्रमामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी मा.श्री दीपक पटेल साहेब , तालुका कृषी अधिकारी कु.स्नेहल शिंदे मॅडम, कु.सोनल सोनोने मॅडम (मंडळ अधिकारी ),श्री सिद्धार्थ गवई (सरपंच),श्री पूनाजी गवई (उपसरपंच ),श्री शिवशंकर बाठे (पोलीस पाटील), श्री भास्कररराव देशमुख (प्रगतशील शेतकरी) श्री ब्रम्हानंद सोनोने, श्री भानुदास कडाळे गुरुजी ,श्री दिलीप गवई ,श्री बळीराम वनारे,श्री ज्ञानेश्वर बाठे व गावातील समस्त शेतकरी वर्ग उपस्थित होता.सदर कार्यक्रमाची प्रस्तावना कु.शिंदे मॅडम तर संचालन सौ.ज्योती ठाकरे मॅडम कृषी सहाय्यीका यांनी केले. तसेच कार्क्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुनील दांडगे यांनी केले.