ओबीसी संघर्ष समितीची आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निवेदन

0
1069
Google search engine
Google search engine
अकोटः प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील ओबीसी संघर्ष समिती व विविध समविचारी संघटना यांच्या वतीने आकोट उपविभागीय अधिकारींना गुरवारी ८ आॕक्टो.रोजी निवेदन देण्यात आले.ओबीसी समाजातील सर्व जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मेगा नोकर भरती तात्काळ सुरू करावी, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण सुरू करावे, ओबीसी यांनी निर्माण केलेल्या संस्था व महामंडळास  एक हजार कोटी रुपये त्वरित द्यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात यावी, व विद्यार्थी वस्तीगृह सुरू करण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले
. निवेदन देण्याकरिता ओबीसी संघर्ष समितीतर्फे रमेश आकोटकर हरिनारायण माकोडे  डॉ. गजानन महल्ले श्यामसुंदर भगत, निलेश राधेश्याम झाडे  मंगेश चिखले  मंगेश लोणकर, गजानन धर्मे, केशवराव बिलबिले, राजेश भालतिलक, निलेश काळे, योगेश श्रीराम नाठे, विलास बोडखे, उमेश हेंड, गजानन थोरात, नितीन टोलमारे ,मोहन बेराड, राधेश्याम बोडखे, ज्ञानेश्वर घायल, रामकृष्ण मिसाळ, विवेक धुळे, बाळासाहेब घावट,
संजय राहटे, सचिन वडतकर, धनंजय जालंदर, पंकज श्रीवास्तव, वसंत नेमाडे, विजय ढेपे ,सुनील देठे ,अशोक हिरुळकर, वासुदेव भास्कर, शंकरराव पूंडकर, देवानंद गयधर, बंटी पांडे, पुष्पक चेडे, अक्षय रोही, सागर बोरोडे यांच्यासह विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.