शेतकरी मोटर्स द्वारा रस्ता सुरक्षा जनजागृती बाबत रांगोळी स्पर्धा

0
2146
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

शहरातील शेतकरी मोटर्स येथे मेगा सर्विस कार्निवल अंतर्गत जेसीआय अकोट व रोटरी क्लब ऑफ अकोट च्या वतीने रस्ता सुरक्षा ह्या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत २० स्पर्धकांनी आपला सहभाग घेतला.कार्यक्रमाचे उदघाटन अकोट ग्रामीण चे ठाणेदार ज्ञानोबा फड ह्यांनी केले ह्या वेळी जेसीआयचे पवन ठाकूर, जेसिरेट विंग चेअर पर्सन मंगलाताई गणोरकार रोटरीचे संजय बोराेडे माजी अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार उपस्थित होते.

ह्या स्पर्धेची विशेषतः म्हणजे सर्वच स्पर्धकांनी शासकीय नियमाचे पालन करत मास्क,सॅनी टायजरचा वापर करत,थर्मल चेकिंग व सोसिअल डिस्टन्सीग राखून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.स्पर्धेसाठी स.९ ते दु. ५ वाजेपर्यंत रांगोळी काढण्यात आल्या ज्यामुळे स्पर्धा स्थळी गर्दी झालेली नव्हती.

सध्याच्या ह्या कोरोना महामारीत अपघाताचे प्रमाण कमी झाले असून ते असेच कमी राहावे ह्या साठी लोकांमध्ये रास्ता सुरक्षितते बदल जनजागृती व्हावी म्हणजे गाडी चालवितांना मोबाईलचा वापर करू नये, जास्त वेगात गाडी चालवू नये , वाहतुकीचा नियम चे पालन करावे ,नेहमी हेल्मेट वापरावे रोड सिग्न चा वापर करावा,मद्यपान करून गाडी चालवू नये,सीट बेल्टचा वापर करावा असे अनेक संदेश ह्या रांगोळी मधून सर्व कलावंतानी दिले .

ह्या स्पर्धेत आकांशा दीपक सावळे,संदेश पंजाबराव चोंडेकर,अंकिता गजानन गोठवलं,वर्षा शेखर हुसे ,गौरव शरद काळे, ऋतुजा माधव काळे,अंकिता रमेश उपासे, स्नेहा श्याम बहादूरे ,स्वाती संदीप कोकाटे , धनश्री नंदकिशोर शेगोकार, दीपाली विनोद कडू यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जेसीआयच्या मीना शेगोकार ,दीपाली कडू ,माया इंगळे,विवेक गणोरकर, विनोद कडू निलेश इंगळे यांच्यासह शेतकरी मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.