वांगी येथे वाफारा मिशनचे मोफत वाटप : उद्योजक विकासराव सूर्यवंशी यांचा पुढाकार*

सांगली/ कडेगांव

सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील वांगी येथील कै.पै. शंकरराव तात्या सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ उद्योजक विकासराव सूर्यवंशी यांनी गावातील गरीब व गरजू ९० लोकांना तसेच कोरोना योद्धा म्हणून काम करत असलेल्या आरोग्य सेविका, आशा सेविका यांनाही मोफत वाफारा मिशनचे वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र मोठ्याप्रमाणात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. दररोज रूग्ण सापडत आहेत. कोरोना रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी शासन लोकांना तोंडाला मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे या बरोबरच वाफारा घेण्याबाबत प्रबोधन करत आहे. वांगी गावामध्ये साडपत असलेल्या कोरोना रूग्णाच्या पार्श्वभूमीवर उद्योजक विकासराव सूर्यवंशी यांनी वडील कै.पै.शंकरराव तात्या सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ गावातील गरीब व गरजू लोकांना वाफारा मशिन वाटप करण्याचा निर्णय घेवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. यावेळी डॉ. मलमे यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तयार केलेल्या जीवनमृत वनस्पती अर्क याचेही वाटप करण्यात आले.
विकासराव सूर्यवंशी म्हणाले, कोरोना रोगाचे संकट मोठे आहे. लोकांनी जागरूकपणे कोरोना रोगाचा प्रतिकार केला पाहिजे. आपल्या गावात कोरोना रोगाचा संसर्ग कमी झाला पाहिजे. यासाठी वडीलांच्या स्मरणार्थ मोफत वाफारा मिशन वाटप केले आहे. लोकांनी दिवसातून चार वेळा वाफारा घेवून कोरोना मुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
यावेळी सरपंच डॉ. विजय होनमाने, सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुर्योदय सूर्यवंशी, बाजार समितीचे माजी सभापती नाथाजीराव मोहिते, ग्रामपंचायत सदस्य संजय कदम, सोनहिरा दूध संघाचे माजी संचालक गोरख कांबळे, माजी उपसरपंच राहुल साळुंखे, यशवंत कांबळे, संदीप जगदाळे, सत्यजीत सूर्यवंशी, संकेत सूर्यवंशी, सचिन शिर्के यांच्यासह आरोग्य सेविका, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.