पिंच्याक सिल्याट ” खेळाडुंचा 5% राखीव नोकरी भरतीमध्ये समावेश करा

0
380
Google search engine
Google search engine

पिंच्याक सिल्याट ” खेळाडुंचा 5% राखीव नोकरी भरतीमध्ये समावेश करा

अकोटः ता. प्रतिनिधी

महाराष्ट्र ” पिंच्याक सिल्याट ” असोसिएशनच्यावतीने ना. आदिती तटकरे (राज्यमंत्री उद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रिडा व युवक कल्याण )यांना पिंच्याक सिल्याट ” खेळाडुंचा 5% राखीव नोकरी भरतीमध्ये समावेश करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

भरती मधे समावेश करण्यासाठी उच्चस्तरीय समीतिचे गठन करण्यात आले आहे खेळाडूंना न्याय देण्यासाठी आम्ही लवकरच चागला निर्णय घेवू असे आश्वासीत केले

” पिंच्याक सिल्याट” हा खेळ इंडीनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असून या खेळाला ” युवक कल्याण “आणि ” क्रीडा मंत्रालय ” भारत सरकार व ” भारतीय विश्वविद्यालय संघ ” ” ऑलम्पिक कांऊसिल ऑफ एशियाची ” मान्यता असून हा खेळ एशियन गेम,बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय यांच्या अधिकृत ” राष्ट्रीय ” व ” आंतरराष्ट्रीय ” स्पर्धांमध्ये खेळला जातो हा खेळ स्वसंरक्षसाठी विध्यार्थी व विद्यार्थिनी युवक, युवती व महिलामध्ये देशभरात प्रसिद्ध होत आहे. मागील 7 वर्षांपासून ” महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट ” हा संघ राष्ट्रीय पातळीवर अव्वल असून त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत ” पिंच्याक सिल्याट ” खेळ खेळणारे महाराष्ट्र राज्यात हजारो गुणवंत खेळाडू असून एशियन गेम , बिच गेम व ऑलम्पिक गेम स्पर्धात ते उत्कृष्ट कामगिरी करून अनेक पदके राज्याला मिळवून देऊ शकतात हा खेळ नुकत्याच केंद शासनाने शिफारस केलेल्या खेळांच्या यादीमध्ये 1 सप्टेंबर 2020 पासून या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी 5%राखीव नोकर भरती मध्ये केला आहे केंद्र शासनप्रमाणे राज्यशासनाने या खेळाचा 5 %नोकर भरती मध्ये समावेश करून महाराष्ट्रातील या खेळात खेळणाऱ्या हजारो खेळाडूंना नोकर भरतीत न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातुन केली आहे.