*दर्यापूर अमरावती मार्गावर धामोरी जवळ दुचाकीचा अपघात दुचाकी चालक ठार*

793
जाहिरात

 

प्रतिनिधी :-गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर

दर्यापूर अमरावती मार्गावर झालेल्या अपघातामध्ये एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकी चालक जागीच गतप्राण झाला. अपघात धामोरी थांब्याजवळून काही अंतरावर झाला असून आज दुपारी दोनच्या सुमारास घटना घडली

एका अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक MH 27BU2761 ला धडक दिल्याने, दुचाकी चालवत असलेला युवक अंकुश सुभाषराव काळे वय 30 वर्ष हा अपघातात ठार झाला. अंकुश काळे हा चिंचोली वरून दर्यापूरला आपल्या नातेवाईकाकडे जात होता. परंतु नातेवाईकांकडे पोहोचण्याआधीच त्याचा अपघातांमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

हा अपघात दर्यापूर अमरावती मार्गावरील धामोरी थांब्यापासून काही अंतरावर झाला.ही घटना आज आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती धामोरी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती खोलापूर पोलिसांना मिळताच प्रभारी ठाणेदार वेरुळकर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांनी अंकुश चा मृतदेह रोडच्या मध्य भागात पडून होता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविले. तरी पुढील तपास खोलापूर पोलीस स्टेशन करीत आहे.