हिवरखेड ते रंभापुर रा.महामार्गाच्या डांबरीकरणाची चौकशी करा

357

सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना युवासेनेचै निवेदन.

अकोट:प्रतिनिधी

अकोट तालूक्यातील हिवरखेड ते रंभापुर राज्यक्रंमाक ४७ डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता हा ६ महिन्यात उखडला असुन त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. शासनाने करोडो रू खर्च करून सदर रस्ता बांधला आहे. पण बांधकाम विभाग व ठेकेदाराच्या भष्टाचारी वुत्तीने सदरहू रस्ता उखडला असून त्या रस्त्यावर टाकण्यात आलेला डांबरीकरण माल निकृष्ठ दर्जाचा टाकण्यात आल्या मुळे तो रस्ता उखडून गेला व मोठे खड्डे पडले आहेत. शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणे काम झाले नाही त्यामुळे पूर्ण उखडला आहे. या रस्त्यांची पाहणी करून त्रयस्त पक्षामार्फत चौकशी करून संबधीतांकडुन पैसा वसूल करण्यात यावा अशी मागणी युवासेना विस्तारक तथा उपजिल्हाप्रमुख राहुल रामाभाऊ कराळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदननातुन केली आहे.

जाहिरात