खोलापूर येथे भीषण अपघात , शिंगणापूर येथील दोघे जण ठार – कार चालक घटनास्थळावरून फरार…?

0
10315

अमरावती दर्यापूर मार्गावर एकाच आठवड्यात तीन मोठे अपघाताने या मार्गाने दुचाकी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महावितरण कार्यालय समोरील घटना

खोलापूर येथे आज दुपारी १वाजता दरम्यान खोलापुर बस स्टँडच्या काही अंतरावर विद्युत वितरण कंपनी दरम्यान एका स्विफ्ट डिझायर क्र. Mh 27 ar 7606 या कार ने एका दुचाकीला भीषण धडक दिली यामध्ये शिंगणापूर येथील रवी श्री.इंगळे(३६) व बापूराव बा.इंगळे (४२) हे गंभीर जखमी झाले होते.गावातील नागरिकांनी पोलिसांच्या सहकार्याने त्यांना प्रा.आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून अमरावती नेले.अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी. त्यांना मृत घोषित केले. तसेच या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार किशोर जुनघरे आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले तसेच घटनेचा पंचनामा केला पुढील तपास खोलापुर पोलीस करीत आहेत.
तसेच खोलापूर परिसरातील नागरिकांनी स्पीड ब्रेकर देण्याची मागणी…

प्रतिनिधी :- गजानन खोपे